आपलं शहर

Mumbai Municipal corporation : मुंबईकरांच्या खिशाला कात्री, भरावा लागणार अग्निसुरक्षा शुल्क कर

Mumbai Municipal corporation : लॉकडाऊन आणि कोरोना संकट एका बाजुला असताना आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी एका कारणाने कात्री लागणार आहे.

Mumbai Municipal corporation :

लॉकडाऊन आणि कोरोना संकट एका बाजुला असताना आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी एका कारणाने कात्री लागणार आहे. कारण मुंबई महापालिका (Mumbai Municipal corporation) 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारणार आहे. एकीकडे कोरोना संकटाचे कारण देत महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे अग्निसुरक्षेचे कारण देत, सरसकट इमारतींकडून शुल्क आकारणी केली जाणार आहे आणि विरोधी पक्षाने याचा विरोध केला आहे.

2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून ‘अग्निसुरक्षा शुल्क’ घेण्यात येणार असून प्रति चौरस मीटर सुमारे 10 ते 15 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाणार आहे. कोरोनाचा हवाला देत मालमत्ता कर, पाणी पट्टीतील वाढ याला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध केला. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने अग्निसुरक्षा शुल्क

महत्त्वाचं म्हणजे 3 मार्च 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून पूर्वलक्षी प्रभावाने अग्निसुरक्षा शुल्क वसूल केलं जाणार आहे. रहिवासी क्षेत्रफळ, रहिवासी इमारती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने, एकूण क्षेत्रफळ यानुसार हे शुल्क घेतलं जाणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments