आपलं शहर

Mumbai News Live : कुठेही थुंकणाऱ्या मुंबईकरांवर चाप, 200 च्या जागी 1200 रुपयांचा दंड, पाहा कधीपासून…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडेल महागात...आत्तापर्यंत 28 लाख रुपयांचा दंड वसूल..

मुंबईमध्ये सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणाऱ्या लोकांना आता भारी दंड भरावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणांवर थुंकलात तर 200 रुपयांऐवजी 1,200 रुपये दंड भरावा लागू शकतो. आशी माहिती मंगळवारी बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सध्या अशाच एका प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या लोकांवर लवकरच 200 पेक्षा अधिक रुपयांचा दंड वसुलीचा नियम लागू करता येईल व लोकांकडून जास्तीचा दंड वसूल करता येईल.(If you spit in public places, you may have to pay a fine of Rs 1,200 instead of Rs 200)

राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर लागू होईल नियम
बीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर हा नियम लागू होईल. त्याचबरोबर हा नियम लागू करण्यासाठी 2006 च्या मुंबई स्वच्छता आणि सफाई नियमांमध्ये बदल करावे लागेल. हा नियम लागू झाल्यास रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे महागात पडणार आहे.(The rules will come into force after getting the approval of the state government)

बीएमसीने वसूल केला 28 लाख रुपयांचा दंड
मागील सहा महिन्यांमध्ये बीएमसीने रस्त्यांवर थुंकणाऱ्या लोकांकडून आत्तापर्यंत 28 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. दंड आकारून देखील अनेकजण रस्त्यावर थुंकताना दिसतात. त्यामुळे दंडाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.(BMC recovered a fine of Rs 28 lakh)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments