खूप काही

Mumbai Petrol-diesel price:पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ,शंभरी पार गाठला उच्चांक…

मुंबईतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी एक ऐतिहासिक उंची गाठली आहे.

Mumbai petrol-diesel price: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेक आर्थिक तसेच मानसिक संकटांना मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा (14 जून रोजी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 29 ते 31 पैशांनी वाढविण्यात आल्या. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी एक ऐतिहासिक उंची गाठली आहे.आज पेट्रोलच्या दराने 102.58 रुपये प्रतिलीटर इतका उच्चांक गाठला. डिझेलची विक्रीही 31 पैशांनी वाढून डिझेलचा दर 94.70 रुपये झाला. (Petrol diesel price in Mumbai)

मागील 15 दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि विदेशी विनिमय दराच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार करतात.काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांदरम्यान सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी 18 दिवसाच्या अंतरानी 4 मेपासून किंमतींमधे 24वी वाढ केली.

दिल्लीत 29 पैशांनी पेट्रोल तर 30 पैशांनी डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे.या दरवाढीमुळे राष्ट्रीय राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.41 रुपये आणि डिझेल 87.28 रुपये झाली.

कोलकातामध्ये (kolkata petrol diesel price) पेट्रोलचे दर प्रतिलिटर 96.34 रुपये तर डिझेल 90.12 रुपये प्रतिलीटर आहे.राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि लडाखसहित सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलचा दर प्रतिलीटरसाठी 100 च्या वर आहे.

प्रत्येक ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर वेगवेगळे का?

व्हॅट (vatt) आणि मालवाहतूक शुल्कासारख्या स्थानिक करांच्या घटनेनुसार इंधनाचे दर राज्यात वेगवेगळे असतात. देशात पेट्रोल आणि डिझेलवर राजस्थानात सर्वाधिक व्हॅट लागतो, त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांचा क्रमांक लागतो.(petrol diesel price hike)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments