आपलं शहर

Mumbai Police :बँक मॅनेजरचा लाखोंचा घोटाळा, एटीएम क्लोनिंगने काढले लाखो रुपये

मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यावर धक्कादायक गोष्ट समोर आली.

Mumbai Police :मुंबई पोलिसांनी क्लोनिंग कार्डचा (Cloning Cord) वापर करून एटीएममधून पैसे काढणाऱ्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी एका मोबाईल शॉपमध्ये मोबाइल खरेदी करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला.

क्लोनिंग कार्ड वापरून एटीएममधील पैसे काढणाऱ्या या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केल्यावर धक्कादायक गोष्ट समोर आली. या चोरीमध्ये बँकेचा मॅनेंजरसुद्धा सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना तीन आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

विशेष म्हणजे या टोळीचा सूत्रधार एक बँकमॅनेजर होता. या टोळीचे सर्व काम मोबाईलद्वारे केले जायचे. त्यामुळे मोबाईल खरेदीसाठी आले असताना खबर मिळताच पोलिसांना या टोळीला अटक करण्यात यश आले. आरोपींची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून 40 हून अधिक एटीएम कार्ड, 250 ब्लेम एटीएम कार्ड, क्लोनिंग मशीन, पिन क्रमांक आणि डाटा इत्यादी साहित्य जप्त केले आहे.

या टोळीचा मुख्य सूत्रधार एक बँक मॅनेजर आहे. हा मॅनेजर बंगलोरमधून ( bank manager inbangalore) आपल्या सहकार्यांना बँकेच्या खात्याचे तपशील, एटीएम पिन आणि बँकेतील खातेदारांचा इतर डेटा पाठवत असे. याचा वापर करून आरोपी एटीएम कोड क्लोन करून एटीएममधील पैसे काढत असत. परंतु ग्राहकांना याची भनकही लागत नसे. एटीएममधील पैसे काढल्यावर बँक मॅनेजर आरोपींकडून 15 टक्के कमिशन घेत असे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांनी दिली.

ग्राहकांच्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे कळतात, त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी सदर माहितीच्या आधारे टोळीवर पाळत ठेवून त्यांची माहिती मिळताच मोबाईल शॉपमध्ये अटक केली. मात्र अशा अनेक तक्रारी आता समोर येत आहेत, सतर्क राहण्याची गरज आहे. मुंबई पोलीस निरीक्षक यांनी कॉलिंग कार्ड वापरून एटीएम मधील पैसे लंमपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments