कारण

Mumbai politics update:विधानसभेचे अध्यक्ष कोण बनणार, थोरातांनी केले मोठे भाष्य…

विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना बाळासाहेब थोरात यांनी मोठे वक्तव्य केले.

Mumbai politics update:पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड होणार असल्याचे म्हटले जात असताना महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे अध्यक्ष कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली असताना बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेचे अध्यक्ष काँग्रेसमधूनच (congress) असतील असा दावा केला आहे.(Who will be the Speaker of the Legislative Assembly?)

शरद पवार (sharad Pawar) राजकारणातील एक मोठे व्यक्तीमत्व आहेतच त्याचप्रमाणे महा विकास आघाडी पक्षाचे ते मार्गदर्शकदेखील आहेत त्यामुळे
त्यांना पक्षात बंद करण्याची गरज नाही
आणि त्यांना भेटण्यात काहीच गैर नाही असे बाळासाहेब थोरात यांचे म्हणणे आहे.

महामंडळाचे योग्य वाटप लवकरच होईल आणि त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना योग्य कामाची संधी मिळू शकेल.आणि महाविकास आघाडीचे हे सरकार भक्कम आहेत्यामूळे पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल असे बाळासाहेब थोरात यांचे मत आहे.

केंद्र सरकारच्या (central government) कृषीसंबंधित कायद्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन कृषी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल असा विश्वास बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments