खूप काही

Mumbai:म्हाडाच्या इमारतींचे पावसाळा पूर्व सर्वेक्षण पूर्ण,अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

म्हाडाकडून पाऊसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींची यादी जाहीर,मुंबईमध्ये तब्बल 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादाक

Mumbai:म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहरतील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून 21 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. म्हाडाच्या (MHADA-The Maharashtra Housing & Area Development Authority)  या 21 इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या 10 इमारतींचा समावेश आहे

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या ( Mumbai Repairs and Reconstruction Board) अखत्यारीत 14 हजार 755 उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. त्यानुसार मे महिन्या अखेरपर्यंत 09 हजार 48 उपकरप्राप्त इमारतींचे (68 टक्के) सर्वेक्षण करण्यात आले होते. दरवर्षी  या इमारतींचे पावसाळ्यापूर्वी सर्वेक्षण केले जाते मात्र आता हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 21 इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहे. (Mumbai: Pre-monsoon survey of MHADA buildings completed, list of high risk buildings released)

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेल्या 21 इमारतींची यादी पुढीलप्रमाणे:

1) इमारत क्रमांक 144,एमजीरोड,अ- 1163 (मागील वर्षीच्या यादीतील)
२) इमारत क्रमांक 133 बी बाबुलाल टँक रोड,  बेगमोहम्मद चाल ,
३) इमारत क्रमांक 54 उमरखाडी,1 mm ली गल्ली छत्री हाऊस ,
४) इमारत क्रमांक 101-111, बारा इमारत रोड,  (मागील वर्षीच्या यादीतील)
५) इमारत क्रमांक 74 निजाम स्ट्रीट,  (मागील वर्षीच्या यादीतील)
६) इमारत क्रमांक 123,किका स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)
७) इमारत क्रमांक 166 डी मुंबादेवी रोड ,  (मागील वर्षीच्या यादीतील)
८) इमारत क्रमांक 2-4 ए ,2री भोईवाडा लेन ,
९) इमारत क्रमांक 42 मस्जिद स्ट्रीट
१०) इमारत क्रमांक 14 भंडारी स्ट्रीट  (मागील वर्षीच्या यादीतील)
११) इमारत क्रमांक 64 -64 ए  भंडारीस्ट्रीट, मुंबई
१२) इमारत क्रमांक 1-3-5 संत सेना महाराज मार्ग
१३) इमारत क्रमांक 3 सोनापूर 2री क्रॉस लेन
१४) इमारत क्रमांक 2-4 सोराबजी संतुक लेन  ,
१५) इमारत क्रमांक 387-391,बदाम वाडी व्ही पी रोड  (मागील वर्षीच्या यादीतील)
१६) इमारत क्रमांक 391 डी बदाम वाडी,व्ही पी रोड  (मागील वर्षीच्या यादीतील)
१७) इमारत क्रमांक 273 -281 फॉकलँड रोड, डी,  2299- 2301   (मागील वर्षीच्या यादीतील)
१८) इमारत क्रमांक 1, खेतवाडी 12 वी  गल्ली(डी ) 2049  (मागील वर्षीच्या यादीतील)
१९)  इमारत क्रमांक 31-सी व 33- ए रांगणेकर मार्ग व 19 पुरंदरे मार्ग गिरगाव चौपाटी
२०)   इमारत क्रमांक 104-106 मेघजी बिल्डिंग अ, ब  व क विंग , शिवदास चापसी मार्ग
२१) इमारत क्रमांक 15-19 के. के. मार्ग व 1-3 पायस स्ट्रीट
या अतिधोकादायक इमारतींमध्ये 460 निवासी व 257 अनिवासी असे एकूण 717 रहिवासी / भाडेकरू आहेत. यापैकी 193 निवासी भाडेकरू / रहिवाशांनी त्यांची स्वतःची इतरत्र पर्यायी व्यवस्था केली आहे. आतापर्यंत 20 निवासी भाडेकरू /रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. उर्वरित 247 निवासी भाडेकरू / रहिवाशांना निष्कासनाच्या सूचना देऊन गाळे खाली करून घेण्याची कार्यवाहीसुरू आहे.  सदर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशी/ भाडेकरू यांना आवश्यकतेनुसार मंडळातर्फे जागा खाली करण्याच्या सूचना देण्याची व त्यांची पर्यायी व्यवस्था संक्रमण शिबिरात करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments