आपलं शहर

Mumbai rain update : राज्यात पावसाची दमदार एन्ट्री, मुंबईला अतिवृष्टीचा धोका…

मुंबई आणि नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

Mumbai rain update: राज्यात सलग चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD-Indian meteorological department) वर्तवली होती.त्यामुळे मुंबई (mumbai rain) आणि मुंबईच्या शेजारील काही भागात ऑरेंज अलर्ट (orange alert) जाहीर करण्यात आला. यानुसार आज सकाळी मुंबईत पावसाच्या सरींनी बरसायला सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत धुमाकूळ घातल्याने मुंबईतील हिंदमाता ,सायन आणि किंग सर्कल रोडवर पाणी साचले. मुंबईत पावसाचे दमदार आगमन झाले आहे. (Heavy rains enter the state, Mumbai is at risk of heavy rains …)

पावसाळ्याची सुरुवात होताच मुंबईची झाली तूंबई…

मुंबई आणि नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली यातच सायन किंग सर्कलवरील रस्त्यांवर पाणी साचले आहे.सध्यातरी रस्त्यावरील वाहतूक आणि ट्रेन सेवा सुरळीतपणे सुरु आहे पण जर असाच पाऊस सुरू राहिला तर लवकरच मुंबईची पुन्हा एकदा तुंबई व्हायला वेळ लागणार नाही. (As soon as the rainy season started, Mumbai became Tumbai …)

तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 ते 15 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने रेड अलर्ट (Red alert) जाहीर केला होता परंतु काल रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) पावसाने पूर्णता ब्रेक घेतला आहे जाहीर करून देखील रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची एकही सर बरसलेली नाही.

पावसामुळे भाजीविक्रेत्यांचे नुकसान…

गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे लोकांना बरेचसे नुकसान सहन करावे लागले आहे.यातच नवी मुंबईतील एपीएमसी भाजी मार्केटमधील भाजी विक्रेत्यांना मोठा फटका बसला, मुसळधार पावसामुळे भाजीची उठाठेव झाली नसल्याने 10 ते 15 टक्के फळभाज्या,पालेभाज्या खराब झाल्या आणि भाज्यांचा दर देखील 10 ते 11 टक्‍क्‍यांनी कमी झाला. (Damage to vegetable sellers due to rains …)

महाराष्ट्राला पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट (orange alert) तर नाशिक,धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट (yellow alert) घोषित केला आहे. (Maharashtra in danger of heavy rains for next three days)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments