आपलं शहर

Mumbai rain update: मुंबईला मुसळधार पावसाचा फटका, 250मिमीहून जास्त पावसाची नोंद…

IMD ने पुढील चार दिवस महाराष्ट्रातील मुंबई,पालघर आणि ठाणे जिल्ह्यात 'रेड' अलर्ट जारी केला आहे.

Mumbai rain update: राज्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यातच गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.त्यामुळे बुधवारी(9 जून 2021 रोजी) भारतीय हवामान खात्याने (IMD-Indian meteorological department) पुढील चार दिवस महाराष्ट्रातील मुंबई,पालघर आणि ठाणे जिल्ह्यात ‘रेड’ अलर्ट जारी केला आहे. ( Heavy rains hit Mumbai, more than 250 mm of rain recorded …)

बुधवारी दिवसभरात सकाळी 5 वाजल्यापासून ते सायंकाळी 5वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरात सर्वाधिक 214.44 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.त्यापाठोपाठ पश्चिम उपनगरात 190.78 मिमी आणि शहर भागात 137.82 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पाहुया मुंबई पूर्व उपनगरातील सरासरी पावसाची नोंद…

विक्रोळी – 285.99 मिमी
चेंबूर – 280.52 मिमी
मानखुर्द – 258.52 मिमी
गोवंडी – 258.52 मिमी
घाटकोपर – 210.22 मिमी
कुर्ला – 231.45 मिमी
इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
विक्रोळी येथे सर्वात जास्त-285.99 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.(Let’s see the average rainfall recorded in the eastern suburbs of Mumbai …)

मुंबई पश्चिम उपनगरातील पावसाची सरासरी नोंद…

मरोळ – 272 मिमी
अंधेरी (पूर्व) – 271.76 मिमी
मालवणी – 253.88 मिमी
गोरेगाव – 217.36 मिमी
अंधेरी ( प.) – 215.03 मिमी
दहिसर – 208.22 मिमी
सांताक्रूझ – 207.64 मिमी
वर्सोवा – 207.49मिमी
वांद्रे – 86.99 मिमी
इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
मरोळ येथे सर्वात जास्त म्हणजे 272 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Average rainfall in Mumbai suburbs …)

मुंबई शहर भागातील पावसाची सरासरी नोंद...

रावली कॅम्प – 282.61 मिमी
धारावी – 276.92 मिमी
दादर – 237.97 मिमी
माटुंगा – 234.93 मिमी
वरळी – 173.94 मिमी
मुंबई सेंट्रल – 148.49 मिमी
भायखळा – 127.74 मिमी
हाजीअली – 124.19 मिमी
इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

रावली कॅम्प परिसरात सर्वात जास्त म्हणजे 282.61 मिमी तर, नरिमन पॉईंट येथे 53.22 मिमी आणि कुलाबा येथे 54.85 मिमी इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.(Average rainfall in Mumbai city area.)

मुसळधार पावसामुळे मुंबई शहर व उपनगरामध्ये अनेक ठिकाणी रुळांमध्ये पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेन सेवादेखील ठप्प पडली.दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( chief minister uddhav Thackeray) यांनी पावसाळ्याचे पाणी लवकरात लवकर निचरा व्हावे आणि वाहतुकीची कामे पुन्हा सुरू व्हावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments