आपलं शहर

Mumbai rain update : मुंबईत पावसाचा जोर कायम, पालिकेकडून हाय अलर्ट जाहीर…

आयएमडीच्या (IMD) इशाऱ्यानंतर, येत्या दोन दिवसांत महानगरपालिकेने संबंधित एजन्सींना "हाय अलर्ट" जारी केला आहे.

Mumbai rain update:मुंबईत (mumbai) गेल्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडला,तरीदेखील यावेळी शहरात पाणी साचले नाही आणि लोकल ट्रेनसह बसेसही त्यांच्या वेळापत्रकानुसार धावल्या. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली असे म्हणायला हरकत नाही. (Rain continues in Mumbai, Municipal Corporation issues high alert)

यापूर्वी दोन दिवस मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत मुंबईत सरासरी 79.66 मिमी, तर पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये 92.68 मिमी ते 89.30 मिमी दरम्यान पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई पालिकेच्या हवामान खात्याने दिली आहे.

हवामान विभागाने शनिवारी मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ (orange alert) आणि रविवारी ‘रेड अलर्ट’ (red alert) जाहीर केला होता. हवामान खात्याने यापूर्वी मुंबई व ठाणे (Thane) जिल्ह्यात काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता.

आयएमडीच्या (IMD-indian meteorological department) इशाऱ्यानंतर, येत्या दोन दिवसांत अति मुसळधार पावसाचा अंदाज पाहता महापालिकेने संबंधित एजन्सींना “हाय अलर्ट” (High Alert) देखील जारी केला आहे. तसेच बेस्ट (BEST) , अडाणी (Adani) आणि इतर एजन्सीसारख्या वीज वितरण कंपन्यांसह सर्व कंट्रोल रूमना ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला व त्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत तसेच मदतीसाठी एनडीआरएफला (NDRF) देखील सज्ज राहण्याचे आदेश दिले असा दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments