आपलं शहर

Mumbai Rain Update : हिंदमाता परिसरात 30 जूननंतर कधीच पाणी साचणार नाही, आयुक्तांचा दावा

'पाणी भरणार नाही, असा दावा मी कधीच केला नव्हता'- किशोरी पेडणेकर

Mumbai rain update: मुंबईला बुधवारी पहिल्याच पावसाने चांगले झोडपून काढले होते. पहाटेपासून पाऊस पडल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. रेल्वे रुळांवर पाणी साचले होते, तर रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी कामावर जाणाऱ्या लोकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढणे देखील कठीण झाले.

किशोरी पेडणेकरांनी दिले स्पष्टीकरण
अनेक भागांमध्ये पाणी तुंबल्यामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. याबाबतीत स्पष्टीकरण देताना महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी असे वक्तव्य केले की, ‘पाणी भरणार नाही, असा दावा मी कधीच केला नव्हता’. (‘I never claimed it wouldn’t fill up.’ This statement was made by Kishori Pednekar)

प्रत्येक मुसळधार पावसामध्ये हिंदमाता, दहिसर, सायन इत्यादी ठिकाणी पाणी साचत. परंतु या पाण्याचा काही तासातच निचरा होतो. परंतु हाय अलर्ट असल्यामुळे पाण्याचा निचरा व्हायला थोडा वेळ लागेल. कोरोनामुळे कामगार कमी मिळाल्याने हिंदमाता प्रकल्पाला उशीर झाला आहे. आमचं काम सगळ्या जगाने पाहिले आहे. असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

आयुक्तांनी पावसावरच खापर फोडले
तर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सर्व काही पावसावर ढकलून दिले. त्यांनी संगीतले की, 24 तासात 500 मिली पाऊस पडला की, त्याला अतिवृष्टी म्हणतात. परंतु काल 1 तासात 100 मिलीहून अधिक पाऊस पडला. त्यामुळे पाणी साचण्यास सुरुवात झाली. जास्त पाणी साचल्याने ड्रेनेजमधून पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागणारच.(Commissioner Iqbal Singh Chahal lashed out at the rain)

हिंदमाता परिसरात 140 कोटींचा प्रकल्प सुरू आहे. सप्टेंबरमध्ये प्रकल्पाला सुरूवात झाली. जानेवारीमध्ये प्रकल्पाची ऑर्डर दिली गेली आणि आता हा प्रकल्प पूर्ण व्हायला अजून 30 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल इथून पुढे कधीच पाणी साचणार नाही.

विरोधकांनी केली शिवसेनेवर टीका
पाणी साचल्याने विरोधकांनी शिवसेनेवर टीका केल्या. भाजपनेते प्रभाकर शिंदे यांनी याबाबतीत शिवसेनेला जबाबदार मानले आहे. ते म्हणाले की, कालच्या बैठकीत महापौरांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले होते. परंतु पहिल्याच पावसात मुंबईत पाणी साचले.(Opposition criticizes Shiv Sena)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments