आपलं शहर

Mumbai Unlock : मुंबई अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात, पाहा काय सुरु काय बंद

मुंबईकरांना अनलाॅकच्या तिसर्‍या टप्प्यातही काही निर्बंध लागू होणार आहेत,जाणुन घ्या सविस्तर माहिती...

Mumbai unlock:मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राज्य सरकारने शहरात अनलाॅक (mumbai unlock) करण्यासाठी परवानगी दिली होती.मात्र सरकारने जाहीर केलेल्या 5 स्तरीय अनलॉक वर्गीकरणात मुंबई तिसर्‍या स्तरावर राहील असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले आहे. मुंबईकरांना अनलाॅकच्या तिसर्‍या  टप्प्यातही काही निर्बंध लागू होणार आहेत.

तिसर्‍या टप्प्याचे काय आहेत निर्बंध…

1. मुंबईत अनलाॅकच्या तिसर्‍या टप्प्यात अत्यावश्यक दुकाने दररोज सकाळी 7ते दुपारी 4 या वेळेत सुरू राहतील तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने ही शनिवारी व रविवारी बंद असतील. (Essential shops will be open daily from 7 a.m. to 4 p.m.)

2. अनलाॅकच्या तिसर्‍या टप्प्यातही मॉल, थिएटर यांना परवानगी नाही, ते पूर्णपणे बंद राहातील.(Malls, theaters are not allowed, they will be completely closed)

3. अनलाॅकमध्ये हॉटेलांना मर्यादित वेळा देऊन परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे हाॅटेल सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल आणि हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहतील.(Hotels are allowed with limited hours.)

4. रेल्वेसेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच राहील. (Railway services will be closed for general passengers)

5.मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा. (Morning walk, grounds, cycling from 5am to 9am.)

6.मनोरंजन कार्यक्रमासाठी 50 टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. (Entertainment event is allowed for the from 4pm Monday to Friday with 50 percent seating)

7.लग्नसोहळ्यांसाठी 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी 20 व्यक्तींना मुभा देण्यात आली आहे. (For weddings, 50 per cent capacity is allowed and 20 persons are allowed to attend the funeral.)

8.खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.तर सरकारी कार्यालयेदेखील 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. (Private offices will be open at 50 per cent capacity till 4 pm, while government offices will also be open at 50 per cent capacity.)

9.आऊटडोअर क्रीडांसाठी पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. (Outdoor sports are allowed from 5 am to 9 am and from 6 pm to 9 pm.)

10. अनलॉकच्या तिसर्‍या टप्प्यात मालिका आणि चित्रपटांसाठी स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी दिली असून ई कॉमर्ससाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. (Allowed shooting in the studio for series and movies)

11.शेतीच्या सर्व कामांना मुभा देण्यात आली असून बांधकामासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. (All agricultural work has been allowed and construction has been given till 4 pm.)

मुंबईत कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी नागरिकांनी सर्व मार्गदर्शक सूचनांचे अनुकरण करावे आणि अनलाॅकच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.(What are the restrictions of the third phase …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments