आपलं शहर

Mumbai unlock update :मुंबई कुठल्या श्रेणीत, पाहा येत्या आठवड्यात मुंबईची परिस्थिती काय

मुंबईकरांना मात्र, अद्याप निर्बंधातून सूट मिळताना दिसत नाहीये

Mumbai unlock update :महाराष्ट्र सरकारने कोरोना (Corona) निर्बंध शिथिल (restrictions relaxation) करण्याच्या संदर्भात एकूण पाच टप्पे तयार केले आहेत. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर पाहून स्थानिक स्थरावर आणि जिल्हा पातळीवरील निर्बंध हटवण्यात येत आहेत.

मुंबईकरांना मात्र, अद्याप निर्बंधातून सूट मिळताना दिसत नाहीये. मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी लागू केलेले निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेशानुसार मुंबई तिसरा श्रेणीत राहील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी रात्री दिली.

महानगरपालिकेने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, बृहन्मुंबईत कोविड पॉझिटिव्हिटी दर 4.40 टक्के असून ऑक्सिजन बेडचे रूग्ण दर 27.12 टक्के इतका आहे. मात्र, मुंबई महानगर लोकल ट्रेनने दाटीवाटीने प्रवास करून मोठ्या संख्येने मुंबईत येणारे प्रवासी तसेच मुंबई शहर परिसरात येत्या काही दिवसांत दिलेला अतिवृष्टीचा इशारा या गोष्टी लक्षात घेता कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईचे आकारमान आणि लोकसंख्या घनता तसेच इतर भागातून येणारे लोक मोठ्या संख्येने लक्षात घेऊन मुंबई मनपा हद्दीत 3 श्रेणीच्या निर्बंधांबाबत घोषणा केली आहे. 5 जून 2021 रोजी जारी केलेल्या नियमांना पुढील आदेशापर्यंत जसेच्या तसे लागू करण्यात आले आहे.

शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांना सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपायजोयना गरजेच्या राहतील. श्रेणी 3 च्या निर्बंधानुसार अनावश्यक वस्तू असलेली दुकाने संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे, परंतु मॉल सिनेमा हॉल मल्टिप्लेक्स बंद राहतील. नवे आदेश सोमवार 14 जून 2021 पासून लागू होतील असेही आदेशात म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments