खूप काही

Mumbai unlock updates : मुंबईत लवकरच अनेक गोष्टी सुरु होण्याचे संकेत…

बीएमसीने ठामपणे सांगितले की मुंबईत अनलाॅकच्या तिसर्‍या लेवलचे निर्बंध त्वरित कमी होणार नाहीत.

Mumbai unlock updates:मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Mumbai corona update) घट झाली आहे आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे तरी महाराष्ट्र सरकारच्या पाच-स्तरीय अनलॉक (mumbai unlock) वर्गीकरणात मुंबई तिसर्‍या स्तरावर राहील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

पॉझिटिव्हिटी रेट (positivity rate) आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यांची परिस्थिती सुधारल्यामुळे शहर ‘लेव्हल 1’ ला पात्र ठरते, परंतु बीएमसीने ठामपणे सांगितले की तिसर्‍या लेवलचे निर्बंध त्वरित कमी होणार नाहीत. (Mumbai unlock updates: Signs that many things will start soon in Mumbai …)

महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोव्हिड-19 रुग्णांचा दर गेल्या आठवड्यात 4.40 टक्क्यांवरून घसरून 3.79 टक्क्यांवर आला आहे तर ऑक्सिजन बेडची व्यापकता 27.12 टक्क्यांवरून 23.56 टक्क्यांवर आली आहे.

मुंबईत आजही सरासरी कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या ही 600 ते 700 दरम्यान आहे त्यामुळे जोपर्यंत ही संख्या 500 च्या खाली येत नाही तोपर्यंत आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले असे म्हणू शकत नाही असे इकबाल सिंग चहल यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने मुंबईला लोक दुसऱ्या पातळीवर ठेवले आहे तरीदेखील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईला तिसऱ्या पातळीवर ठेवण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments