आपलं शहर

Mumbai Update :चक्क मुंबईमध्ये विस्तीर्ण जंगल फुलणार, उध्दव ठाकरेंचा मोठा निर्णय

शिंदे मुंबई हिरवी करण्याचा जणू ध्यास घेतला असल्याचं स्पष्ट होत आहे

Mumbai Update :गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील जंगल वाढवण्याचा प्रस्ताव आखण्यात आला होता. त्यावर चर्चा होऊन आता निर्णय घेण्यात आला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची जागा वनासाठी राखीव ठेवून तिथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. आज 286.732 हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्षरित्या दिला आहे. तसेच यासाठी अभिनेता सयाजी शिंदे यांचही मोठं योगदान असणार आहे.

आरे येथील 125.422 हेक्टर, गोरेगाव येथील 71.631 हेक्टर आणि मरोळ मरोशी येथील 89.679 हेक्टर इतकी जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील 40.469 हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे. हे सर्व पाहता मुंबईतील एकूण 812 एकर जागेवर वन विभागाला जंगल फुलवता येणार आहे.

राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. वृक्षारोपण करणाऱ्या सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेने आता मुंबई हिरवी करण्याचा जणू ध्यास घेतला असल्याचं स्पष्ट होत आहे, तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या समृद्ध निर्मयाचे अनेक स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments