आपलं शहर

Mumbai Updates :अंबरनाथमध्ये नव्या योजनेला सुरुवात, २८ एकर जंगलावर नवा प्रयोग..

आता वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत.

Mumbai Updates :सध्या देशात जंगल नष्ट होताना अनेक उदाहरणे समोर येत आहेत, त्यामुळे जंगल संरक्षणावर अधिक भर दिला जात आहे, अशाच जेवढं होईल तेवढं वन संरक्षणासाठी सरकारसह नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे( new scheme launched in ambernath new experiment on 28 acres of forest)

कधी मानवनिर्मित गोष्टींसाठी जंगलाना नष्ट केले जात आहे, तर कधी नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांचा नाश होत असतो. तसच काहीसं घडत आहे, अंबरनाथ जवळील सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये. परंतु त्यावर आता वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. तिथे नवीन उपाययोजनादेखील सुरु केल्या आहेत.

खरतर जंगलात वारंवार लागत असलेल्या वनव्यांमुळे सह्याद्रीच्या डोंगररांगाचे खूप नुकसान होत आहे आणि त्याचा परिणाम नजिकच उल्हास नदीच्या पात्रावर होत आहे. कारण मोठ्या प्रमाणात नदीतून गाळ वाहून येत असल्याने नदीचे पात्र ही हळूहळू लहान होत चालले आहे.

या गोष्टींना आळा घालण्यासाठी आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि वनविभागाच्यावतीने यंदाच्या पावसाळ्यात एक विशेष मोहीम राबवली जात आहे. याच्या अंतर्गत अंबरनाथ जवळच्या २८ हेक्टर जंगलाभोवती वनवा रोधक तंत्राचा वापर करून सरंक्षक पट्टा तयार करण्यात आला आहे.

जेणेकरून जंगलामध्ये लागणाऱ्या आगींना वेळीस आळा घालता येईल. तसेच तन नाशकाच्या साहाय्याने वाढलेले गवत छाटून जाळरेशा तयार केली जात आहे. या रेशेमुळे वनवा लागलाच तरी तो या रेशेच्या पुढे येऊ शकणार नाही आणि जंगलाची हानी टळू शकेल.

अंबरनाथजवळच्या वरप गावाजवळील वन विभागाच्या 28 हेक्टर जागेत हे काम सुरु झाले आहे. आणि याआधी देखील सगुणा रुरल फाउंडेशनने तयार केलेल्या वणवा रोधकाचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. यामुळे वणवा पसरू शकणार नाही आणि डोंगरावरील जल्स्रोतांचं संवर्षण होईल. तर वन्यजीव देखील मोकळा संचार करू शकतील.

अशाप्रकारे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून उचललेले हे महत्वाचे पाऊल खूपच महत्वाचे असणार आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments