खूप काही

Mumbai vaccination:लस घेऊनही होतेय कोरोनाची लागण,BMC ने सांगितले मुख्य कारण…

सर्वेक्षणाद्वारे समोर आलेल्या आकडेवारीनुसार लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अनेक नागरिकांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे

Mumbai vaccination: कोरोनाचा लढा देण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे लोकांनी वेळेवर लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेणे अत्यावश्यक आहे, कारण फक्त पहिला डोस घेऊन कोरोना पासून बचाव होऊ शकत नाही. बरेच लोक कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण होते.(corona vaccine first and second dose)

कोरोनाच्या लसीचा पहिला डोस हा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रभावी आहेच,मात्र महानगरपालिकेच्या (BMC)  माहितीनुसार लसीच्या पहिल्या डोसपेक्षा दुसऱ्या डोसचा प्रभाव कोरोना मुक्त होण्यासाठी जास्त प्रभावी आहे. (Mumbai vaccination: Corona infection occurs even after vaccination, BMC says main reasons …)

सर्वेक्षणाद्वारे समोर आलेल्या आकडेवारीनुसार लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अनेक नागरिकांना कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. परंतु पहिला आणि दुसरा डोस पूर्णपणे घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण खूप कमी आढळून आले आहे.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर आतापर्यंत 10,500 लोकांना कोरोनाची पुन्हा एकदा लागण झाली आहे, तर कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 53.83 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातील जवळजवळ 10 लाख लोकांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. चांगली बातमी म्हणजे लसीकरण झालेल्या बहुतांश लोकांना कोरोनाची लागण झालेली नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments