खूप काही

Mumbai vaccine : तुम्ही घेतलेली लस बनावट? हजारो मुंबईकरांना दिली गेली बनावट लस…

मुंबईतील जवळपास 2053 नागरिकांना बनावट लस (fake vaccine) देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे.

Mumbai vaccine : कोरोनाच्या (corona) महामारीवर मात करण्यासाठी सर्वांचे लसीकरण (vaccination) होणे अत्यावश्यक आहे. परंतु सर्वांनाच थक्क करणारी बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुंबईतील जवळपास 2053 नागरिकांना बनावट लस (fake vaccine) देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. सदर बोगस लसीकरण मोहीमेची उच्च न्यायालयाने (High court) अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन मुंबई महानगरपालिकेला (BMC) चांगलेच ठणकावले आहे. (Mumbai vaccine: The vaccine you took is fake? Fake vaccine given to thousands of Mumbaikars …)

बनावट लसीकरण प्रकरणात आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत सरकारने दिलेल्या खाजगी लसीकरणासंबंधी मार्गदर्शन सूचनांचे पालन न झाल्याने बोगस लसीकरण यासारखे प्रकार समोर आले आहेत, असे मत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी मांडले.या प्रकरणातील काही गुन्हेगारांना अटक झाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

मुंबईत कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळले रुग्ण…

मुंबईत कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट (delta plus variant) 2 रुग्ण सापडले आहेत. या दोघांपैकी एक रुग्ण ठाण्याचा असून दुसरा रुग्ण मुंबईत उपचार घेऊन सध्या सुखरूप आहे,त्यामुळे शासनाने दिलेले निकष आणि निर्बंधांचे लोकांनी पालन करावे अशी विनंती महानगरपालिकेत कडून केली जात आहे. (Patients of Corona Delta Plus variant found in Mumbai …)

मास्क आणि सेनिटाइजरच वापर ,अंतर ठेवणे हे जर लोकांनी नियमितपणे पाळले तर आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास निश्चितपणे आपण सक्षम होऊ.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments