खूप काही

Mumbai weather alert: येत्या 48 तासात मुंबईसह ‘या’ शहरात मुसळधार पावसाची शक्यता…

हवामान विभागाच्या मते येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे

Mumbai weather alert:पुढील 48 तासात मुंबईसह महाराष्ट्राच्या बर्‍याच भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे अशी माहिती भारत हवामान खात्याने (IMD-India Meteorological Department) दिली.आयएमडीच्या प्रादेशिक पूर्वानुमान केंद्रानुसार शनिवारपर्यंत मुंबई व महाराष्ट्रातील संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. (Heavy rains are expected in Mumbai and other cities in Maharashtra in the next 48 hours.)

सध्या हवामानची परिस्थिती पाहता राज्यातील विविध भागात वेगवेगळ्या तीव्रतेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्र आणि उत्तर कोकण पर्यंत चक्रीवादळ अभिसरण झाल्यामुळे ट्रफ कमकुवत झाला आहे असे आयएमडीने म्हटले आहे.

हवामान विभागाच्या मते येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच मध्य महाराष्ट्रात नंदुरबार ते सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल.दुसरीकडे, नैर्ऋत्य मान्सूनने गुरुवारी केरळचे दार ठोठावले आहे.

आयएमडीने जारी केलेल्या निवेदनात माहिती देण्यात आली आहे की हवामान विभागाने देशात 14 हवामान केंद्रे सुरू केली आहेत. यातील 60 टक्के केंद्रांमध्ये सलग दोन दिवस 2.5 मिमी किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद (IMD Rain alert) झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments