आपलं शहर

BMC Election : तर निवडणुका रद्दही होऊ शकतात, BMC निवडणुकांवर महापौरांच सूचक विधान

हाराष्ट्रात कोरोना संसर्गाची गती हळूहळू कमी होत आहे, पण पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात संशय कायम आहे.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची गती हळूहळू कमी होत आहे, पण पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात संशय कायम आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा परिणाम दिसल्यास पालिकेच्या निवडणुका होणार की नाही, असा संशय अनेक मुंबईकरांकडून वर्तवला जात आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी मोठे विधान केले आहे. न्यूज एजन्सी एएनआयशी झालेल्या चर्चेदरम्यान महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये बीएमसी निवडणुका होणार आहेत, तेव्हा त्या परिस्थितीची दखल घेतली जाईल, कोरोनाची परिस्थिती वाढल्यास निवडणुका घेता येणार नाहीत. आणखी पुढे ढकलाव्या लागतील, आम्ही निवडणुकीची संपूर्ण तयारी करणार आहोत.

तिसरी लाट अधिक तीव्र असेल

सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या परिस्थिती चिंताजनक नाही, परंतु दोन महिन्यांपूर्वी देशातील सर्व भागांची परिस्थिती बिकट होती. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एका दिवसात 50 हजारांच्या पुढे गेली होती, परंतु सध्या देशात कोरोनाची तिसरी लाटमुळे भीती व्यक्त केली जात आहे आणि असे म्हटले जात आहे की तिसरी लाट अधिक प्राणघातक ठरू शकते, ज्यामध्ये मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे भाजपवर आरोप
बीएमसी निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत, पण राजकारण आधीच तापले आहे. सत्ताधारी शिवसेना पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणाऱ्या मुंबई महानरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा कट रचत आहे. असा आरोप महाराष्ट्र भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या विद्यमान प्रशासकीय मंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे, जेणेकरून सांडपाणी प्रक्रिया उभारणीसाठी देण्यात यानाऱ्या 20,000 कोटींच्या (Tender) निवेदनातून कमिशन मिळू शकेल, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments