खूप काही

Navi Mumbai Airport:नवी मुंबई विमानतळाला दिबांच्या नावासाठी पंचमहाभूतांकडून जनजागृती

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील हे नाव देण्यासाठी पंचमहाभूतांची युवा पिढी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उद्या जिल्हाभर साखळी आंदोलन करणार आहेत.

Navi Mumbai Airport:नवी मुंबई विमानतळाला (Navi mumbai airport) दि. बा. पाटील नाव देण्यासाठी आता चार जिल्ह्यातून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सर्वपक्ष कृती समितीची स्थापना केली असून यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पंचमहाभूत नावाचा युवा गृप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. एकीकडे सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) नाव देण्यासाठी रस्सीखेच होत असताना दुसरीकडे मात्र आता पंचमहाभूतांच्या युवा पिढीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुत्र प्रेम दाखवू नये असे संबोधले आहे.

आता दि. बा. पाटील हे नाव नवी मुंबई विमानतळ देण्यासाठी पंचमहाभूतांची युवा पिढी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उद्या जिल्हाभर साखळी आंदोलन करणार त्या सोबत येत्या 24 जून रोजी सिडको (CIDCO) भवन या ठिकाणी घेराव घालून आपला निषेद व्यक्त करणार आहे.

पंचमहाभूत काय आहे?

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील हे नाव देण्यासाठी ठाणे, पालघर रायगड जिल्ह्यातील (raigad district) पाच तरुण पंचमहाभूत नावाचा गृप तयार करून नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याबाबत खेडोपाडी जावून जनजागृती करणार आहेत.(What is Panchmahabhuta?)

2012पासून सुरू आहे मागणी…

2013 ला विमानतळासाठी जमिनी संपादनाच्या वाटाघाटातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांमध्ये विमानतळाला दिबांचे नाव द्यावे ही एक प्रमुख मागणी होती. तर 2012 साली अखिल आगरी परिषदेच्या अधिवेशनात लोकनेते दि बा पाटील हयात असताना भूमिपुत्रांनी नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्याची तात्कालिन मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती. (Demand starting from 2012…)

तर 2015 साली अखिल आगरी परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांनी दिबांच्या नावासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार कपिल पाटील यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यानुसार 2016 ला खासदार कपिल पाटील (kapil patil) यांना मिळालेल्या निवेदना वरुन लोकसभेत प्रथमत: मागणी मांडली.

2018मध्ये भूमिपुत्र महासंघ झाला होता. त्या महासंघाद्वारे क्राँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याकडे निवेदन देण्यात आले. त्यानंतर त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना निवेदन सादर केल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्राशी पत्रव्यवहार केला असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

2018 नागरी उड्डान मंत्रालयाला श्याम म्हात्रे यांनी दिबांच्या नावाची मागणी पत्रक पाठवल्यानंतर 2018-19 ला खासदार कपिल पाटील यांनी पुन्हा संसदेत हा प्रस्थाव मांडला.तर 2020 डिंसेबरमध्ये कोरोनाच्या सावटात जग असताना एकनाथ शिंदे नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे यासाठी मुख्यंमंत्र्याना निवेदन दिले. आगरी समाज परीषद आणि आगरी युवा फाऊंडेशने 20पेक्षा अधिक बैठका घेतल्या मात्र सिडकोने (CIDCO) या विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव करुन भूमीपुत्रांना भडकवले.

त्यामुळे या विमानतळाला दिबांचेच नाव द्यावे या मागणीसाठी पंचमहाभूत गृपच्या वतीने जन जागृती करण्यात येत आहे. तर उदया ठिकठिकाणी पंचमहाभूतांच्या तरुणांकडून साखळी आंदोलन देखील करण्यात येणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.(There will also be a chain agitation by the youth of Panchmahabhuta at various places tomorrow)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments