खूप काही

Navi Mumbai Airport :नवी मुंबई विमानतळाच्या वादात आता बंजारा समाजाची उडी…

नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईक यांचे नाव देण्यासाठी विधानसभा परिसरात बंजारा समाजाने आंदोलन केले आहे.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईक यांचे नाव देण्यासाठी विधानसभा परिसरात बंजारा समाजाने आंदोलन केले आहे. या आंदोलनामध्ये पोहरादेवीचे महंत सुनील महाराज हे विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. (Navi Mumbai Airport: Banjara community now jumps into Navi Mumbai airport dispute …)

एकीकडे दि.बा.पाटलांचे नाव विमानतळाला (international airport at Navi Mumbai) देण्यासाठी नवी मुंबईतील स्थानिकांनी आंदोलन केले,तर आता बंजारा समाजही आंदोलनामध्ये सहभागी झाला असून वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांचे नाव देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.

नवी मुंबई येथील वसंतराव समोरच उभा जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी मुंबईचे निर्माते आणि सिडकोचे (CIDCO) शिल्पकार दिवंगत वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) हे महाराष्ट्राचे दैवत आणि श्रद्धास्थान आहेत त्याचबरोबर माननीय बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) हे देखील वंदनीय नेते होऊन गेले आहेत पण राज्याच्या जडणघडणीमध्ये आणि नवी मुंबईच्या स्थापनेत मोलाचा वाटा असणारे वसंतराव नाईक यांचे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे असे मत पोहरादेवीचे महंत सुनील महाराज (Sunil Maharaj) यांनी केली आहे.

1 जुलै रोजी संपूर्ण राज्यातील बंजारा बांधव वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जमणार असून वसंतराव नाईक यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी शासनाला निवेदन करणार आहे तसेच यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments