आपलं शहर

Navi Mumbai Airport : विमानतळाच्या नावावरून वाद पेटला, भाजप नेत्याकडून बाळासाहेबांचा एकेरी उल्लेख

त्यामुळ नवीमुंबईमध्ये चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे.

Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची मागणी शिवसेनेने उचलून धरली आहे. या मागणीचे पत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या आहे. त्यामुळे विमानतळाचे नाव हे बाळासाहेब की दी. बा. पाटील द्यायचे, हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

शिवसेनेने या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर भाजपने लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नवीमुंबईमध्ये चांगलेच राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारने आधीच आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून केंद्राला पाठवला आहे. मात्र स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. जगदीश गायकवाड यांनीही हा मुद्दा उचलून धरला आहे.

यादरम्यान भजप आणि शिवसेना या मुद्द्यावरून भाजपाचे नगरसेवक पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी एका खाजगी यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे यांच्यासोबतच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्यास विरोध दर्शवला आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदेंना देखील धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. ही ठाण्याची हद्द नाही तर रायगडची हद्द आहे आणि इथले आगरी खूपच डेंजर आहेत. ते पुन्हा एअरपोर्टला नाव देण्यासाठी पुढे येणार नाहीत, अशा प्रकारची धमकी दिली आहे.

हा सर्व प्रकार शिवसेनेचे रायगड- पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. जगदीश गायकवाड यांनी शिवसेनेची बदनामी करून खाजगी यूट्यूब चैनलच्या माध्यमातून बदनामी केल्याने शिवसेनेच्या भावना दुखावल्या असून कळंबोली पोलिसांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments