खूप काही

Navi Mumbai Airport : म्हणून विमानतळाला बाळासाहेबांच्या नावाचा जोर, नेमका काय निघणार तोडगा?

बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) योगदानाबद्दल सांगायची गरज नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले

Navi Mumbai Airport: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai international airport) नाव देण्यावरून संघर्ष सुरू आहेत.एकीकडे नवी मुंबईत हजारोंच्या संख्येने भूमिपुत्र आंदोलन करत असताना दुसरीकडे मात्र बाळासाहेबांच्या (balasaheb Thackeray) योगदानाबद्दल सांगायची गरज नाही असं वक्तव्य नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नवी मुंबईतील भूमिपुत्र पेटून उठले आहेत त्यांनी दि.बा.पाटील यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी 24 जून रोजी आंदोलन पुकारले. आंदोलकांची मुख्यमंत्र्यांसोबत सोबत बैठक झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी (uddhav Thackeray) त्यांना तीन चार पर्याय सांगा असं सांगितलं होतं,अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. (Navi Mumbai Airport: This is the reason for emphasizing the name of Balasaheb at the airport, so what exactly will be the solution?)

दि.बा.पाटील यांचे कार्य आणि योगदान याबद्दल आदर हा सर्वांनाच आहे परंतु बाळासाहेब ठाकरे यांचे ही योगदान सांगण्याची काही गरज नाही आणि त्यांच्याबद्दल ज्या लोकांच्या भावना या देखील स्पष्ट करायची गरज नाही असे विधान करून एकनाथ शिंदे (Eknath shinde)  यांनी शिवसेना अजूनही नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरुन ठाम आहेत हे स्पष्ट केलय.

दोन्ही नेत्यांचे कार्य मोठे आहे त्यामुळे या सर्व गोष्टींवर समाधानकारक मार्ग मिळावा अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे आणि कोरोनाचे संकट लक्षात घेता या सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर मार्ग निघावा अशीच सरकारची देखील भूमिका आहे,असे एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments