आपलं शहर

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वाद पेटला, CIDCO ला घेराव घालण्याची तयारी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, यासाठी भूमिपुत्रांनी 24 जूनला सिडकोला घेराव घालत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं, यासाठी भूमिपुत्रांनी 24 जूनला सिडकोला घेराव घालत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनवेळी नवी मुंबई पोलिसांनीदेखील खबरदारी घेतली आहे.

नवी मुंबई पोलिांकडून महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहे, नवी मुंबईत येणाऱ्या जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पूर्ण बंद राहणार आहे. ठाणे-बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी, नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईकडून येणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाणार आहे, तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईकडे वळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 पर्यंत ही वाहतूक बंदी असणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून ही पावले उचलली आहेत.

लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या मागणीला घेऊन नवी मुंबईत राजकीय वादळ तापायला सुरुवात झाली आहे, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments