आपलं शहर

Navi Mumbai International Airport:विमानतळ नामांतराचा वाद पेटला, ठाकरे, पाटील नंतर नाईकांच्या नावाची चर्चा

Navi Mumbai International Airport:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामांतराचा वादात आता बंजारा समाजाने उडी घेतली आहे, नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची माग

Navi Mumbai International Airport:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामांतराचा वादात आता बंजारा समाजाने उडी घेतली आहे, नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची मागणी आता बंजारा समाज करू लागला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नामांतराचा वाद आणखी पेटला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं अशी मागणी आमदार नीलय नाईक आणि वाशिमच्या पोराडेविचे म्हंत सुनील महाराज आणि बंजारा समाजाने केली आहे.

नवी मुंबईच्या विकासासाठी वसंतराव नाईक यांचे मोलाचे योगदान आहे, असं म्हणतं विधानभवनाच्या परिसरात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. काल दि. 22 जुन रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भेट आंदोलकांनी घेतली आहे, या भेटीतून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वाद लवकर शांत होईल, असं दिसतं नाही. कारण एका बाजूने भाजप नेत्यांनी तर दुसऱ्या बाजूने शिवसेना नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने अजून किती दिवस हे प्रकरण चालणार आहे, हे पाहणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments