खूप काही

Navi Mumbai Rain updates : पुढील 4 दिवसांत जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी रेड अलर्ट

काल रात्रीपासून नवी मुंबईत (New Mumbai) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Navi mumbai rain updates: राज्याला मान्सूनपूर्व पावसाची झळ लागलेली असताना काल रात्रीपासून नवी मुंबईत (New Mumbai) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.राज्याच्या इतर भागांमध्येही येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (heavy rain fall in new mumbai)

सध्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नवी मुंबई आणि पनवेलकर (Panvel ) नागरिकांना दिलासा मिळाला आहे,कारण राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काल रात्री या पावसाने पनवेल आणि नवी मुंबईतील इतर भागात जोरदार सुरुवात केली आहे.

अरबी समुद्रातून(Arabian sea) पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्रात बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यभरात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (weather forecast) वर्तवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) हरनाई येथे पोहोचलेल्या नैऋत्य मॉन्सूनच्या (southwest monsoon) सरींचे शनिवारपर्यंत महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आयएमडीने (IMD- indian meteorological department) वर्तवली होती.परंतु,सध्या हवामानाची स्थिती पाहता नैऋत्य मान्सूनची पुढील प्रगती सावकाश असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीये.

मुंबई उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावलीये.बांद्रा (Bandra), कुर्ला (Kurla), चेंबूर (chembur), अंधेरी (Andheri), जोगेश्वरी (Jogeshwari) , गोरेगाव (goregaon), कांदिवली (Kandivali), बोरीवली (Borivali), मालाड (Malad) आणि दहिसरमध्ये (dahisar) काळेकुट्ट ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.(Mumbai monsoon)

सायन-चेंबूर(Sion-chembur)आणि इसेटर्न एक्स्प्रेस हायवेवर तर (Eastern express highway) मुसळधार पावसामुळे रस्त्यावरची दृश्यता कमी झाली आहे, त्यामुळे रस्त्यावर गाड्या धीम्या गतीने जाताना दिसून येत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments