आपलं शहर

Nesco covid center: गोरेगावमधील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला झिंगाट गाण्यावर डान्स!

अनेकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कार्याबद्दल मानले आभार...

Nesco covid center: मुंबईमधील गोरेगावयेथील नेस्को कोविड सेंटरमध्ये प्रोफेशनल हेल्थकेअर डान्स करताना दिसले. नेस्को कोविड सेंटरला 2 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले असल्याने सेंटरमध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले सर्व हेल्थकेअर झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसले.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. दिवस-रात्र रुग्णांची सेवा करणारे हेल्थकेअर त्या गाण्याच्या प्रत्येक ओळीचा आनंद लुटताना दिसले, त्यामुळे अनेक लोकांनी या व्हिडिओला शेअर केले आहे. हा व्हिडीओ 80 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि या व्हिडिओला हजारहून लाइक्स मिळाले आहेत.(Nesco COVID-19 center several healthcare workers on June 2 were seen dancing inside patient’s ward.)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेक लोकांनी त्याला सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कार्याबद्दल आभार देखील मानले आहेत.(Many people thanked the health workers)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार फटका महाराष्ट्राला बसला होता. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. या परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांवर खूप जास्त ताण होता. परंतु आता परिस्थितीत नियंत्रणात येत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृतांचा आकडा काही दिवसांपासून कमी होत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments