आपलं शहर

Netflix studio: मुंबईत होणार जगातील पहिला नेटफ्लिक्स स्टुडिओ

नेटफ्लिक्सने भारतात जागतिक पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Netflix studio: नेटफ्लिक्स कंपनी सध्या संपूर्ण दुनियेमधील नंबर 1 ओटीटी आहे. त्याचबरोबर या कंपनीचा मासिक शुल्क आणि वार्षिक शुल्क इतर ओटीटी कंपन्यांपेक्षा खूप जास्त आहे. कारण की, नेटफ्लिक्स प्रीमियम ओटीटी कंटेंटमध्ये सगळ्यात पुढे असत.

सध्या चालू असणाऱ्या तगड्या स्पर्धेत डिजिटल एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये ओटीटी प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून नेटफ्लिक्सला ओळखलं जातं. नेटफ्लिक्सने भारतात जागतिक पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नेटफ्लिक्सने पाच वर्षापासून भारतामध्ये काम करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या कंपनीने अनेक भाषांमधील नवीन कन्टेन्ट लोकांपर्यंत पोचवले आहेत.(Netflix to set up its first post-production studio in Mumbai)

नेटफ्लिक्सने केली 3 हजार करोड रुपयांची गुंतवणूक
आतापर्यंत नेटफ्लिक्सने भारतात किती प्रमाणात गुंतवणूक केली आहे हे कधीही स्पष्ट केले नव्हते. परंतु बुधवारी या कंपनीने प्रथमच गुंतवणुकीबद्दल माहिती दिली आहे. नेटफलिक्स कंपनीने मागील दोन वर्षांमध्ये भारतातील विविध भाषांमध्ये कन्टेन्ट बनवण्यासाठी 3 हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात 41 वेब सीरीज आणि चित्रपटांचा समावेश देखील आहे ज्या नुकत्याच नेटफ्लिक्सवर आल्या आहेत.(It invested Rs. 3,000 crores in Indian originals in 2019 and 2020)

स्टुडिओ बनवण्या मागचा उद्देश
बुधवारी कंपनीने अशी माहिती दिली की, नेटफ्लिक्स ही जगात पहिली कंपनी आहे जी लाईव्ह ॲक्शन फुल सर्विस पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ बनवणार आहे. हा स्टुडिओ मुंबईमध्ये उभारणार आहेत. भारतीय चित्रपट, मालिका जागतिक स्तरावर घेऊन जाता याव्या आणि भारतीय कन्टेन्ट इतर देशांमध्ये देखील पहायला मिळावा म्हणून हा स्टुडिओ उभारण्यात येत आहे.(The purpose behind building the studio)

जून 2022 पर्यंत स्टुडिओ होणार सुरू
हा दुनियेतील पहिला स्टुडिओ आहे आणि हा स्टुडिओ जून 2022 पर्यंत सुरू होईल. या कंपनीमध्ये 400 ऑफलाईन एडिटिंग साईट्स असतील. ज्यात त्यांच्या शोसाठी काम करणारे शोअनर्स, डायरेक्टर, एडिटर आणि साउंड डिझायनर असतील. यांना एकत्रित स्टुडिओमध्ये काम करण्याची संधी मिळेल.(Netflix’s fully-owned facility will be ready by June 2022)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments