आपलं शहर

New Mumbai :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, शेतकरी, व्यापारी हतबल

सरकारने राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत.

New Mumbai :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएशनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने याचीही खबरदारी म्हणून सरकारने राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत.

सोमवारपासून (28 जून) तिसऱ्या टप्प्यात निर्बंध लागू केले आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रांत अत्यावश्यक सेवांची दुकाने ही पूर्ण आठवडा दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. अनावश्यक सेवांची दुकाने शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद असतील. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.( Restrictions have been imposed in the third phase since Monday (June 28). Essential service shops in the municipal area will be open till 4 pm for the entire week )

नवी मुंबई एपीएमसी मार्केट : ( New Mumbai APMC Market)

कोरोनाच्या अवघड काळातही नवी मुंबई एपीमसी मार्केटमध्ये लाखोंची वर्दळ पाहायला मिळते. येथील व्यापारी आणि ग्राहक त्या नियमांचे पालन करत नसल्याचे लक्षात येते. याचवेळी प्रशासनाकडूनही काहीप्रमाणात दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे.

तिसऱ्या लाटेची खबरदारी बाळगता राज्य सरकारने कडक निर्बंध जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी प्रशासनाच्या वतीने सॅनिटायजिंग करणे, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये लोकांचे अँटीझन आणि आरटीपीसीआर टेस्टिंग वाढवण्यात आले आहे. तर संपूर्ण मार्केटमधील लोकांना लस मिळाली, यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. इतर मार्केटमध्ये देखील व्यापाऱ्यांनी लसीकरणाची मागणी केली असून तिथेदेखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाढत्या कोरोनामुळे हे निर्बंध लावण्यात आले आहेत. परंतु यात शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांना देखील 15 ते 20 टक्के नुकसान होणार असल्याची माहिती एपीएमसी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे(shankar pingle) यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments