आपलं शहर

Navi Mumbai News Live : नवी मुंबईचे नवे नियम, कोणती दुकाने सुरु, कोण करु शकतं प्रवास…

नवी मुंबईमध्ये नवीन नियमांतर्गत दिलेल्या वेळेनुसार सर्व दुकाने चालू राहतील. मात्र त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय अनेक महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबईमध्ये काही नियम शिथील करण्यात आले आहेत. नियमांतर्गत दिलेल्या वेळेनुसार सर्व दुकाने चालू राहतील. मात्र त्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

अत्यावश्यक सेवांसाठी नियम काय?
अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी दुकाने रोज सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतील. यामध्ये मेडिकल, भाजीविक्री, त्याचबरोबर हार्डवेअरची दुकाने जी पावसाळ्यात गरजेच्या असलेल्या साहित्यांची विक्री करतात अशा दुकानांना संपूर्ण आठवडा चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने फक्त दुपारी 2 वाजेपर्यंतच चालू राहितील आणि शनिवार-रविवार बंद असतील, त्याबरोबर ई-कॉमर्सच्या सुविधा पुरवणारी दुकानेही सोमवार ते शुक्रवादरम्यान सुरू राहतील, अशी माहिती नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असतील (Essential service shops will be open daily)

माल पुरवठा करणाऱ्या वाहनांना नियम
माल पुरवठा करणाऱ्या वाहनांनादेखील वाहतूक करण्यास दुपारी 2 वाजेपर्यंत परवाणगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा याव्यतिरिक्त इतरांच्या वाहतुकीवर दुपारी 2 नंतर निर्बंध असतील. दुकानांना मालपुरवठा करणाऱ्या वाहनांवर कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र दुकानांनी ठरवून दिलेल्या वेळेतच वस्तूंची विक्री करावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. (There are no restrictions on vehicles supplying goods to shopkeeper)

शासकीय कार्यालयात अट
शासकीय कार्यालयांमध्ये 25 % कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करता येणार आहे. त्यामुळे साहजिक शासकीय कामावर ताण पडण्याची शक्यता आहे, मात्र ज्या ठिकाणी वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा आहे, अशा ठिकाणी नागरिकांनी कार्यालयात येऊ नये, असे आवाहनही पालिकेने केले आहे. (Government offices should have only 25% staff presence)

होम डिलिव्हरीला परवानगी
शासनाने दिलेल्या आदेशानुसार होम डिलिव्हरी करणाऱ्या संस्थांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेर जाण्यासाठी काही महत्वाचे किंवा वैद्यकीय कारण असेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून परवानगी घेऊन प्रवास करू शकता, त्याशिवाय प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही, असा खुलासा नवी मुंबई पालिकेकडून करण्यात आला आहे. (Home delivery also allowed)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments