आपलं शहर

Nitin Gadkari : देशात येणार स्वस्तात मस्त गाडीचे इंजिन, नितीन गडकरींचा भन्नाट प्लॅन

तीन महिन्यात फ्लेक्स इंजिन सुविधा सुरू केली जाईल.

Nitin Gadkari :राज्यात पेट्रोलचा दिवसेंदिवस वाढता दर आणि प्रदूषण पाहता सरकारने जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. कृषी उत्पादनाचा वापर करणाऱ्या इथेनॉल आधारित वाहन सुरू करण्याचा विचारदेखील राज्य सरकारने केला आहे. (nitin-gadkari-cheap-car-engines-to-arrive-in-the-country-nitin-gadkaris-abandonment-plan)

इंडियन बँकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महानगर मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबद्दल माहिती दिली. येत्या तीन महिन्यात फ्लेक्स इंजिन सुविधा सुरू केली जाईल. सध्या जगातील बऱ्याच देशांमध्ये फ्लेक्स इंजिन आहेत. तीच सुविधा देशातील ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहोत, अमेरिका, ब्राझील, कॅनडा येथे देखील फ्लेक्स इंजिन उपलब्ध असल्याचे मत गडकरी यांनी मांडले आहे.

हे एक प्रकारचे अल्कोहोल असून हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉल उसापासून तयार होते, पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकते. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा आपण वापर केल्यास सामान्य लोकांना फायद्याचे होईल. कमी खर्चिक, प्रदूषण मुक्त आणि स्वदेशी असेल, हे इंधन अनिवार्य केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अशी माहिती नितीन गडकरींनी बैठकी दरम्यान दिली. इथेनॉलवर चालणारी कार गरम होत नाही, इथेनॉल हे अल्कोहल असल्याने त्याचे बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या भारत देशाला स्थानिक पातळीवर इथेनॉलचा खूप फायदा आहे. इथेनॉलची किंमत प्रतिलीटर 60 ते 62 रुपये दरम्यान आहे, त्याच जागी पेट्रोलसाठी शंभर रुपये भरावे लागतात, त्यामानाने इथेनॉलचे मूल्य कमी आहे आणि वापर सुरू केल्यास लोकांना ते फायद्याचे आल्याचे गडकरींनी म्हटले आहे.

गडकरी म्हणाले “सरकारने या वर्षी सर्व पेट्रोल पंपवरती शंभर टक्के इथेनॉल सुरू केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, पुणे येथे अशा दोन सुविधांचे उद्घाटन देखील केले आहे, यासंह तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांना इथेनॉल बनवण्यासाठी पुढे येण्याचे अवहनदेखील पंतप्रधानांनी केले आहे. मोदींनी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी पेट्रोलसह 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे 2025 पर्यंत लक्ष साध्य करायचे ठरवले होते, परंतु निर्णय बदलून 2023 केले. सरकारने गेल्या वर्षी 2021 पर्यंत पेट्रोलमध्ये 5 % इथेनॉल मिसळले तर 2030 पर्यंत 20% मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments