Vaccination in Mumbai : आज मुंबईत लसीकरण होणार नाही, पाहा मुख्य कारण…
मुंबईत कोरोना लसींचे पुरेसा पुरवठा नसल्याने आज म्हणजेच गुरुवार दिनांक 03 जून 2021 रोजी लसीकरण होणार नाही.

Vaccination in Mumbai : मुंबईत कोरोना लसींचे पुरेसा पुरवठा नसल्याने आज म्हणजेच गुरुवार दिनांक 03 जून 2021 रोजी लसीकरण होणार नाही. मुंबई पालिकेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. पालिकेसह शासकीय लसीकरण केंद्रांवर कोणत्याच प्रकारचे लसीकरण होणार नाही. अशी माहिती पालिकेने दिली आहे. (no vaccination in Mumbai today)
मुंबईमध्ये कोरोना लसीकरणासाठी एकूण 342 केंद्रे आहेत, त्यापैकी 243 केंद्रे मुंबई पालिकेकडून तर 20 लसीकरण केंद्रे महाराष्ट्र शासनाकडून उभारण्यात आली आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी लसींचे पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.
1 जूनपर्यंत मुंबईत कोविड लसच्या 33,24,428 डोस लसीकरण पूर्ण करण्यात आले आहेत. बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार3 जून रोजी लसीकरण होणार नाही, मात्र शुक्रवार दिनांक 4 जूनपासून लसीकरण पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिकेकडून वर्तवण्यात येत आहे.
मुंबईकरांनो,
आम्ही सूचित करू इच्छितो की उद्या (३ जून, २०२१) बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.
आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
लसीकरण केंद्र व वेळापत्रकाविषयीच्या पुढील सूचना आम्ही देत राहू.#MyBMCvaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 2, 2021
कोरोनाची परिस्थिती
मुंबईमध्ये 2 जून रोजी कोरोनाच्या 925 नव्या कोरोनाची नोंद झाली आहे. तर 24 तासात बरे झालेले रुग्णांची संख्या 1632 वर पोहोचली आहे. यामुळे आतापर्यंत 6 लाख 74 हजार 296 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईमध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 95 % इतका झाला आहे. सध्या मुंबईत 16 हजार 580 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.
#CoronavirusUpdates
२ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण – ९२५
२४ तासात बरे झालेले रुग्ण – १६३२
बरे झालेले एकूण रुग्ण – ६७४२९६
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १६५८०
दुप्पटीचा दर- ४७७ दिवस
कोविड वाढीचा दर ( २६ मे ते १ जून)- ०.१४ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 2, 2021