कारण

OBC Reservation : भाजपनंतर राष्ट्रवादीही मैदानात, ओबीसी आरक्षणासाठी थेट केंद्राला आव्हान

ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली.

OBC reservation : महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीयांना (OBC Reservation) राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष भुजबळ म्हणाले की, मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ( PM Narendra Modi) झालेल्या बैठकीनंतर आंदोलनाची माहिती दिली जाईल.(Bhujbal’s Elgar for OBC reservation, a direct challenge to the Central Government)

लोकांचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा पाच जिल्ह्यांचा नाही तर पूर्ण राज्याचा आणि देशाचा आहे. छगन भुजबळ यांनी सोमवारी, महात्मा फुले समता परिषदेच्या प्रमुख 100 कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत आंदोलनाची घोषणा केली.

सगळंच आरक्षण संपलेलं आहे

स्थानिक संस्थांमध्ये ओबीसीसाठी असणाऱ्या आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे, त्यासाठी राज्य सरकारला एम्पिरकल डाटा (Empirical data) गोळा करण्यासाठी एक कमिशन नेमण्याचे आदेश दिले आहेत. (All reservations are over)

राज्य सरकार संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत आगामी महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा समावेश असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना कोणत्याही जागा राखीव राहणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी राखीव असलेल्या सुमारे 65,000 जागांवर परिणाम होणार आहे, असा दावा भुजबळ यांनी केला.

ओबीसींसाठी लढा

आरक्षण पुनर्संचयित करण्यासाठी‘ ‘ओबीसी बचाव जनजागृती आंदोलन ’ या नावाने आंदोलन करण्याचा निर्णय छगन भुजबळ यांनी घेतला आहे. परंतू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली जाणार आहे. आरक्षणाच्या विषयावर दिल्लीत चर्चा केली जाईल, त्यासाठी उद्यापर्यंत थांबलो आहोत, त्या निकालाच्या आधारे आम्ही पुढील कार्यक्रम ठरवू, असे मत छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत मांडले आहे.(Fight for OBCs)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी ओबीसी आरक्षणच्या विषयावर चर्चा केली आहे. तर शरद पवारांनी हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून राज्यभर लागू होईल, म्हणून अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे नियोजन करावे लागेल, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यासोबतदेखील छगन भुजबळांनी या विषयावर चर्चा करून देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांना समजावून सांगावे, अशी विनंती केली आहे, यावर फडणवीसांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचेही छगन भुजबळांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. (After BJP, NCP is also in the fray, directly challenging the Center for OBC reservation)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments