खूप काही

Oil Prices Today: पेट्रोल डिझेल नाही, मात्र या तेलाच्या किंमती झाल्या 30 रुपयांनी कमी

तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो 30 रुपयांची घट झाली आहे. या किंमतीमध्ये अजूनही 5 ते 10 रुपये कमी होण्याची शक्‍यता आहे.

Oil Prices Today: मागील काही दिवसांपासून तेलाच्या दरात वाढ पाहायला मिळत होती, परंतु आता तेलाचे नवीन दर सर्वसामान्यांना दिलासा देणारे आहेत. केंद्र सरकारने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्यामुळे खाद्य तेलाच्या किंमतीमध्ये घट झाली आहे.

वाढत्या तेलाच्या किंमतीत घट झाल्याने, सध्या तेलाच्या किंमती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत. त्याचबरोबर एमपीएसमी मसाला मार्केटमध्ये देखील तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो 30 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे तेलाच्या किंमतीत घट होऊन ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

खाद्य तेलाच्या किंमती का वाढल्या होत्या?

खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीवर कोरोनाचा देखील परिणाम झाला होता. कोरोना काळामध्ये खाद्य तेलाचे उत्पादन कमी झाले होते, त्यामुळे पुरवठा देखील कमी होत होता. तेलाची मागणी जास्त असल्याने, खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण होऊन तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली होती. तेलाच्या किंमती 40 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. उत्पादन कमी झाल्यामुळे किंमतीमध्ये वाढ पाहायला मिळाली.(Why did edible oil prices rise?)

खाद्य तेलाच्या किंमतीत घट

मागील महिन्यात वाढलेल्या तेलाची किंमत आता कमी होत आहे. तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो 30 रुपयांची घट झाली आहे. भारतात 60 टक्के खाद्यतेल आयात केले जाते, तर 40 टक्के तेल भारतातच बनवले जाते. परंतु केंद्र सरकारने खाद्यतेलाचे मोठ्या प्रमाणात आयात सुरू केल्याने, खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.(Edible oil prices fell)

पुन्हा एकदा तेलाचे उत्पादन सुरळीत चालू झाल्याने तेलाच्या किंमती कमी होऊन, स्थिर होत आहेत. त्याचबरोबर या किंमतीमध्ये अजूनही 5 ते 10 रुपये कमी होण्याची शक्‍यता आहे, असे व्यापारी महेश गाडे यांनी सांगितले.

तेलाचे नवीन दर

नवीन दर आधीचे दर
शेंगदाणा तेल 150 180
सूर्यफूल तेल 140 170
सोयाबीन तेल 130 160
पाम तेल 115 155(New oil prices)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments