आपलं शहर

Petrol diesel price: पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पहा आजचे दर…

पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Petrol and diesel price:देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील आग शांत होण्याचे नाव घेत नाही. तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) आज पुन्हा डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आहेत (Petrol diesel prices 6th June 2021).

आज देशातील 135 जिल्ह्यांमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे.पेट्रोलमध्ये 27 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलमध्ये 29 पैशांची वाढ झाली आहे. यावर्षी पेट्रोलच्या किंमतीत सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कच्च्या तेलाच्या किंमतीही सतत वाढत चालल्या आहेत.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आज राजधानी दिल्लीत (Delhi petrol diesel price) एक लिटर पेट्रोलची किंमत 95.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 85.95 रुपये आहे. त्याचप्रमाणे मुंबईत (mumbai petrol and diesel price) पेट्रोलचे दर 101.25 रुपये आणि डिझेलचे 93.10 रुपये, कोलकातामध्ये (kolkata diesel and petrol price) पेट्रोल 95.02 रुपये आणि डिझेलचे 88.80 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोलची (Chennai petrol and diesel price) किंमत 96.47 रुपये आणि डिझेल 90.66 रुपये प्रति लिटर आहे. (Petrol and diesel prices in big cities)

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कशा ठरविल्या जातात?

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मुळ किंमतीच्या जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत याच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात.(How are petrol and diesel prices determined?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments