कारण

Pradeep sharma: कोण आहेत प्रदीप शर्मा?

एनआयएच्या एका पथकाने अत्यंत गोपनियता बाळगत प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला.

सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा देखील सामील असल्याचा संशय एनआयएला आहे.

सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची चौकशी झाली होती
या आधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून कसून चौकशी झाली होती. परंतु आज थेट छापा मारण्यात आले. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा मारण्यात आला
मुकेश अंबानीच्या घराबाहेर जिलेटिनच्या वीस कांड्या आणि धमकी वाले पत्र ठेवून स्कॉर्पियो गाडी उभी करण्यात आली होती. चौकशीदरम्यान गाडीचे मालक मनसुख हीरेन यांचा मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी केल्यावर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

सचिन वाझे हे प्रदीप शर्मा यांच्या जवळचे असल्याने एप्रिल महिन्यात यांची देखील चौकशी करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव हा तपास बंद झाला आणि आज सकाळी एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा मारून त्यांची चौकशी केली.(Why raid on Pradeep Sharma’s house)

केंद्रीय राखीवर पोलीस दलाचे जवानही या ठिकाणी तैनात
एनआयएच्या एका पथकाने अत्यंत गोपनियता बाळगत प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. प्रदीप शर्मा राहात असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय राखीवर पोलीस दलाचे जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.(Police personnel were also deployed outside Pradip Sharma’s house)

प्रदीप शर्मा कोण आहेत?
प्रदीप शर्मा हे उत्तर प्रदेशातील असून त्यांचे वडील धुळ्यामध्ये स्थलांतरित झाल्याने ते लहानपणापासूनच ते महाराष्ट्र राहिले आहेत. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले. महाराष्ट्रातील 1983 ची पोलीस बॅच प्रसिद्ध होती. या बॅचमध्ये प्रदीप शर्मा देखील होते.(Who is Pradip Sharma?)

प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. निवृत्तीनंतर प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेकडून नालासोपारा मध्ये निवडणूक लढवली होती.
मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments