Pragya Thakur : भाजप खासदार बरळले, मुंबई बॉम्बस्फोटमधले हेमंत करकरे देशभक्त नाहीत…
भोपाळच्या खासदार या नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात.

Pragya Thakur :भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Bhopal MP pragya thakur ) या नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ येथील सीहोर येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी वादग्रस्त विधान केले आहे.(BJP’s Bhopal MP Sadhvi Pragya Singh Thakur has once again made a controversial statement)
ठाकुर यांनी पुन्हा एकदा मुंबईत झालेला 26 /11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे (hemant karkare) यांच्यावर देशभक्तीचा प्रश्न निर्माण केला आहे. देशात पहिली आणीबाणी 1975 (Emergency) मध्ये लागू करण्यात आली होती आणि दुसरी आणीबाणी 2008 मध्ये लागू झाली होती. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी ठाकूर यांना तुरुंगात टाकले होते. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप देखील केले.
आणिबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हेमंत करकरे यांच्या संदर्भात साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की; मला खोट्या खटल्यात फसवले जात आहे. हेमंत करकरे यांनी चुकीच्या पद्धतीने मला खटल्यात अडकवले आहे. स्वतः ही गोष्ट मी अनुभवली आणि पाहिली देखील आहे. परंतु दहशतवाद्यांनी गोळ्या घालून करकरे यांना शहीद केले त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळाली. मी त्यांना देशभक्त मानत नाही. असे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा ठाकूरने केल्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
हेमंत करकरे देशभक्त नाहीत, ज्यांनी मला इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण दिलं, त्या शिक्षकांची बोटे करकरेंनी छाटली, लोक देशातले वास्तवात देशभक्त असतात, त्यांना कधीच देशभक्त म्हणत नाहीत. असं मत प्रज्ञा ठाकरुने मांडलं आहे.
प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान देशभक्तीचा प्रश्न उपस्थित केला होता. शहीद झालेले हेमंत करकरे यांच्या संदर्भात भाजप खासदारांचे हे काही पहिलेच विधान नाही. याआधी अनेकदा प्रज्ञा यांनी असे विधान केलं आहे.
मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.https://t.co/BJDVe7zK9N
— Lokmat (@MiLOKMAT) June 26, 2021