कारण

prashant kishor says “शरद पवारांचे प्रयत्न तेवढे चालणार नाहीत”, प्रशांत किशोरांचा कोणाला इशारा?

देशातील अनेक पक्षातील नेते एकत्र येऊन बैठका घेत आहेत, त्याचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असल्याचं म्हटलं आहे.

prashant kishor says देशातील अनेक पक्षातील नेते एकत्र येऊन बैठका घेत आहेत, त्याचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं असल्याचं म्हटलं जात आहे. आज (22 जून रोजी) ही बैठक होणार आहे, त्या बैठकीत तृणमूलपासून इतर पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत, मात्र या सगळ्यावर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (prashant kishor) यांनी आपलं मत मांडलं आहे. (prashant kishor says opposetion meetting cant challenge bjp )

शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठका या आधीही झालेल्या आहेत. भाजपच्या विरोधात आखलेली रणनिती तितक्या प्रमाणात लागू होणार नाहीत, असं मत प्रशांत किशोरांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी बोलवलेली बैठक ही भाजपला आव्हान देणारी जरी असली तरी भाजपवर तितका परिणाम होणार नाही, असं किशोर म्हणतात.

आतापर्यंत एका महिन्यात प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यामुळे साहजीकच मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहेत. मात्र या चर्चांवरही प्रशांत किशोरांनी आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात की, आम्ही ज्या वेळेला भेटलो आहोत, त्यावेळेला आमच्यामध्ये राजकीय चर्चा होत असतात, त्यामुळे भाजपला विरोध करणे असो, सत्तेतून बाजूला करणे असो, किंवा इतर राजकीय पक्षांबद्दल आमच्यामध्ये चर्चा होत असल्याचं प्रशांत किशोर म्हणतात.

विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र करणार, शरद पवारांनी ठोकला शड्डू | sharad pawar met opposition

पश्चिम बंगालमध्ये झालेला ममता बॅनर्जींचा विजय हा विरोधी पक्षांना संकेत आहे. भाजप विरोधी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कोणताही पक्ष सत्तेमध्ये येऊ शकतो किंवा निवडणूक जिंकू शकतो, असे मत प्रशांत किशोर यांनी यावेळी मांडले आहे.

राजकीय वर्तुळात असंही म्हटलं जातय की प्रशांत किशोर यांनी मांडलेलं हे मत भाजपला गाफिल ठेवण्यासाठीदेखील असू शकतं. कारण शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर भाजपनेही अनेक ठिकाणी सावधानीची भूमिका घेतली असल्याचं म्हटलं जातय. मात्र आता येणारा काळच राजकीय भविष्य ठरवू शकेल हे नक्की.

कोण असणार भेटीला

 • यशवंत सिन्हा
 • पवन वर्मा
 • संजय सिंग
 • डी राजा
 • फारुख अब्दुल्ला
 • न्यायमूर्ती ए पी सिंह
 • जावेद अख्तर
 • के टी एस तुळशी
 • करण थापर
 • आशुतोष
 • अ‍ॅड. मजीद मेमन
 • खासदार वंदना चव्हाण
 • माजी सीईसी एस. वाय. कुरेशी
 • के सी सिंह
 • संजय झा
 • सुधींद्र कुलकर्णी
 • कॉलिन गोन्साल्विस
 • अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार
 • घनश्याम तिवारी
 • प्रीतीश नंदी

असे नेते बैठकीला असण्याची  शक्यता प्राथमिक तत्वावर वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments