आपलं शहर

Pratap Sarnaik Thane Maharashtra : अजित पवारांना सोन्याचा फोन देणारे सरनाईक एवढे चर्चेत का?

Thane Maharashtra : लेटर बॉम्बने महाराष्ट्रात खळबळ माजवनारे प्रताप सरनाईक नेहमीच काही न काही कारणावरून चर्चेत असतात.

Thane Maharashtra : लेटर बॉम्बने महाराष्ट्रात खळबळ माजवनारे प्रताप सरनाईक नेहमीच काही न काही कारणावरून चर्चेत असतात. प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, या पत्रात तुम्ही भाजपशी जुळवून घ्यावे असे सांगण्यात आले आहे. इतकच नाही तर त्यांनी भाजप आणि शिवसेनेतील युतीवरही भाष्य केले आहे.

भाजप आणि शिवसेना यांची युती जरी तुटली असली तरी या पक्षातील दोन्ही नेत्यांचे वैयक्तिक संबंध अत्यंत चांगले आहेत, सलोख्याचे आहेत, म्हणून या दोन्ही पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या पत्रामुळे महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा जवळ येणार आहेत का? किंवा महाविकास आघाडीमध्ये काही वाद होत आहेत का, असे असंख्य मुद्दे यानिमित्ताने चर्चेत आलेले आहेत.

प्रताप सरनाईक हे जरी एक शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेते नसले तरीदेखील त्यांच्या या पत्राची चांगलीच दखल राजकीय वर्तुळात घेतली जात आहे. प्रताप सरनाईक चर्चेत येण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. ज्याने प्रताप सरनाईक चर्चेत आले आहेत, यासारख्या असंख्य मुद्द्यांवरून प्रताप सरनाईक हे चर्चेत आले होते.

1997 साली प्रताप सरनाईक राष्ट्रवादी पक्ष्याच्या तिकिटावरून ठाण्यामध्ये नगरसेवक झाले होते. त्यांनंतर ते 3 वेळा ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक होते. प्रताप सरनाईक आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीची फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर त्यांच्या बाहेरही चर्चा होती. 2008 साली प्रताप सरनाईक राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत असताना त्यांनी अजित पवारांना सोन्याचा फोन गिफ्ट केला होता त्यावेळी प्रताप सरनाईक चर्चेमध्ये आले होते. मात्र अजित पवारांना ही गोष्ट फारशी आवडली नसल्याने त्यांनी फोन परत पाठवला.

काय होता प्रसंग

मुंबईतील सिद्धी विनायक मंदिराला अनेकजण देणगी देत असतात. लाखो भाविंकांचं आराध्य दैवत म्हणून त्याकडे पाहिलं जातं. अशाचठिकाणी एका भाविकाने सोन्याने जडलेला हार दान केला होता. मात्र सिद्धिविनायक न्यासाकडून मंदिरासाठी मिळालेल्या वस्तूंचा लिलाव केला जातो. अशावेळी संबंधित फोनचादेखील लिलाव करण्यात आला आणि तो फोन प्रताप सरनाईक यांनी 15 लाख 15 हजार रुपयांना विकत घेतला. विकत घेतलेला फोन स्वत: न वापरता सरनाईकांनी त्यांचे जवळचे नेते अजित पवार यांना भेट म्हणून दिला. मात्र ही गोष्ट अजित पवारांना तितकी आवडली नाही.

अजित पवार यांनी सरनाईकांनी दिलेला फोन पुन्हा सिद्धीविनायक न्यासाकडे सुपुर्त केला. आपला मुलगा पार्थ पवार यांच्या हस्ते तो फोन सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडे दिला आणि त्यातून आलेला पैसा गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा सल्ला दिला.

अत्यंत मोठ्या अशा प्रमाणामध्ये या गोष्टीची चर्चा त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणात झाली होती आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला.

प्रताप सरनाईक दुसऱ्या एका गोष्टीवरून जास्त चर्चेत असतात ती म्हणजे त्यांनी आयोजित केलेली दहीहंडी. प्रचंड मोठी अशी रक्कम, दिग्गज अभिनेत्यांची लागलेली तिथे वर्णी असे विविध मार्गातून प्रताप सरनाईक हे नेहमीच चर्चेत असतात. शिवसेनेमध्ये आल्यानंतर प्रताप सरनाईक यांचा मातोश्रीवरील राबताही वाढला. उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांमध्ये प्रताप सरनाईक यांना बघितलं जाऊ लागलं. शिवसेनेमधील सगळ्यात जास्त रिसोर्सफुल नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाऊ लागलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments