खूप काही

Railway news : चांगली बातमी,पुण्यात प्रवास करताय तर नक्की पहा काय आहे प्लॅटफॉर्म तिकीटाचा दर…

अनलाॅक प्रक्रिया सुरु झाल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीत घट झाली आहे.

Railway news : राज्यात अनलॉक (Unlock) प्रक्रिया सुरू होताच अनेक निर्बंध कमी झाले, त्यामुळे रेल्वेवरील निर्बंध कमी करण्यासाठी प्रवाशांच्या हालचालीही वाढल्या. हे विचारात घेऊन पुणे रेल्वे स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म (platform ticket) तिकिटाची किंमत लॉकडॉऊनच्या (Lockdown) काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून 50 रुपये केली होती,ती आता 10 रुपये करण्यात आली आहे.

आतापासून पुणे रेल्वे (Pune railway) विभागांतर्गत पुणे, कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangali) आणि मिरज रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 10 रूपये असेल.

प्लॅटफॉर्म तिकिट सरसकट न देता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना सोडल्यास बाकी नागरिकांनाच देण्यात येईल, असे जाहीर केले आहे.

रेल्वे प्रशासनाने (railway ministry) अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पुण्यावरून काही विशेष गाड्या (Special trains from Pune) सुरू केल्या आहेत. 1 जुलैपासून पुणे-मुंबई मार्गावर इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू होणार्‍या प्रमुख गाड्यांपैकी एक आहे.

पुणे-मुंबई इंद्रायणी (Indrayani express) एक्स्प्रेसबरोबरच नागपूर, अंजनी, अमरावती आणि अहमदाबाद मार्गावरील विशेष गाड्याही पुन्हा सुरू होतील.

कोल्हापूर-नागपूर विशेष ट्रेन 2 जुलैपासून पुन्हा सुरू होईल, तर नागपूर-पुणे आणि पुणे-नागपूर विशेष ट्रेन 4 जुलैपासून सुरू होणार आहेत.

7 जुलैपासून अंजनी-पुणे एक्सप्रेस सुरू होणार असून,पुणे-अमरावती-पुणे विशेष एक्सप्रेस 8 जुलैपासून सुरू होईल. आठवड्यातून तीन दिवस दर सोमवारी, गुरुवार आणि शनिवारी धावणाऱ्या पुणे-अहमदाबाद विशेष गाड्या 1 जुलैपासून सुरू होतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments