खूप काही

Raj Thackeray:राज ठाकरेंवर कोसळला दुःखाचा डोंगर,प्रिय श्वानाचे झाले निधन…

राज ठाकरेंच्या जेम्सचे अचानक निधन झाल्याने निरोप देताना राज ठाकरे यांचे मन भरून आले...

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना प्राण्यांची खूप आवड आहे हे सर्वांनाच माहित आहे. राज ठाकरेंच्या सर्वात प्रिय ‘जेम्स’ नावाच्या कुत्र्याचे नुकतेच निधन झाले आहे. वयोमानानुसार जेम्सने सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्राण्यांवर प्रेम हे सर्वांना ठाऊक आहे. राज ठाकरेंच्या श्वान कुटुंबातील एका कुत्र्याचे नुकतेच निधन झाले. अनेक वर्षांपासून राज ठाकरे यांच्याकडे असलेल्या जेम्स नावाच्या कुत्र्याचे सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास निधन झाले.(A wave of grief in Raj Thackeray’s house, the sudden death of a beloved dog)

जेम्ससोबत राज ठाकरे यांचे वेगळेच नाते होते.आपल्या सर्व श्वानांमध्ये जेम्स हा त्यांचा सर्वात प्रिय कुत्रा होता. जेम्ससोबत राज ठाकरे यांचे तरुणपणातील अनेक फोटो आपण पाहिले असतील. ते अनेक ठिकाणी जेम्सला सोबत घेऊन जात असत. जेम्सच्या अशा आकस्मित जाण्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. (Raj Thackeray dog)

राज घरातील सर्वच प्राण्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम करतात. साहजिकच ठाकरे परिवारातील इतर सदस्यांनाही कुत्र्यांविषयी जिव्हाळा आहे. सध्या राज ठाकरेंच्या घराचं रक्षण देखील ‘कन्या’ नावाची कुत्री करते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments