आपलं शहर

Recovery Rate in Mumbai : मुंबईकरांवच संकट टळलं, सक्सेस पासून दिल्लीश्वरांना मुंबई पॅटर्नची चाहूल

मुंबईकरांना अजून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपट्टीचा कालावधी अजून वाढला आहे.

Recovery Rate in Mumbai : मुंबईकरांनी कोरोनावर चांगलीच मात केली आहे, मात्र या सगळ्यात आता अजून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपट्टीचा कालावधी अजून वाढला आहे. (Recovery rate in Mumbai at 500 days)

मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना पालिकेने केलेल्या नियोजनाची सर्वत्र चर्चा होत आहे. कोरोना रुग्णांसह रुग्ण दुपट्टीच्या वेगावरही पालिकेने आपले नियंत्रण ठेवले आहे.

मुंबईतल्या के इस्ट, आर साऊथ, एच वेस्ट, पी नॉर्थ, एच इस्ट, एल, डी, जी साऊथ, टी, एम वेस्ट, एन, एफ नॉर्थ, इ, एम इस्ट, एफ साऊथ, जी नॉर्थ, बी, सी. या वार्डमध्ये रुग्ण दुप्पटीचा 500 ते 1000 दिवसांच्या वर गेल्याने इथे राहणाऱ्या रहिवाशांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

एकूण मुंबई शहराचा विचार केल्यास आठवड्याला रुग्ण दुप्पट होण्याचा दर 0.12 आहे, याच सरासरीनुसार बघायचं झाल्यास शहरात रुग्ण दुप्पट होण्यासाठी तब्बल 543 दिवसांचा कालावधी लागतो.

दिल्लीश्वरांना मुंबई पॅटर्नची चाहूल

मुंबईकरांसह मुंबई पालिकेने करोना रोखण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे मुंबई मॉडेलची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे, त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील मुंबई पॅटर्नचं कौतुक केलं आहे.

मुंबई पालिकेने ज्या उपाययोजना मुंबईकरांसाठी राबवल्या आहेत, त्याच योजना आता दिल्लीमध्ये राबवल्या जाणार आहेत. इथल्या अनेक तंत्रांचा वापर आता दिल्लीमध्ये केला जाणार आहे. इथल्या वॉर्ड रूमची पद्धत, ऑक्सिजन पुरविण्याची पद्धत, कमी कालावधीत उभारलेली कोव्हिड सेंटर या सगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments