बीएमसी

Rules of ganesh utsav 2021 : कोरोनामुळे यावर्षीही गणेशोत्सवावर निर्बंध, वाचा संपूर्ण नियमावली

Rules of ganesh utsav 2021 :  कोरोनाचा धोका लक्षात घेता, या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे..

Rules of ganesh utsav 2021 :  कोरोनाचा धोका लक्षात घेता, या वर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, त्यानुसरा काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. आता त्या संपूर्ण नियमावली आपण पाहाणार आहोत.

सार्वजनिक गणेशोत्सव 2021 साठी निर्बंध

1) सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळाने यावर्षी महापालिका, स्थानिक प्रशासन धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणे गरजेचे असणार आहे.

2) कोरोनामुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका आणि सबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण आखले आहे, सुसंगत आणि मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत, यावर्षी गणेशशोत्सव पूर्णपणे साध्या पद्धतीने साजरा होणे अपेक्षित आहे, तसेच घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची सजावट करताना भपकेबाजी नसावी, असे आवाहन मंडळांना केले आहे.

3) श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट तर घरगुती गणपतीसाठी 2 फुटांची मुर्ती असावी.

4) यावर्षी पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे, मूर्ती शाडूची आणि पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन घरच्या घरी करावे, घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम तळ्यात विसर्जन करावे.

5) उत्सवाकरिता वर्गणी किंवा देणगी स्वइच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.

7) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक शिबिरे आयोजित करण्यास यावेत आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छता यांची जनजागृती करावी.

8) लागू करण्यात आलेल्या leval of restrictions for breaking the chain याबाबत निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार निबंध कायम राहतील, त्यामध्ये गणेशशोत्सवानिमित कोणतीही शितीलता देता येणार नाही.

9) आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे, तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे.

10) श्रीगणेशाची दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट किंवा फेसबुक सारख्या सोशल मीडियाद्वारे करावी. याची उपलब्धता करून देण्यासाठी जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

11) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंग पर्याप्त व्यवस्था करावी, प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतर ठेऊन आणि स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

12) श्रीगणेशाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुक काढण्यात येऊ नयेत, विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे, चाळीतील किंवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या मिरवणुका एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.

13) महापालिका विविध मंडळे गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वंमसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात यावी.

14) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबधित महापालिका, पोलीस स्तानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच परिपत्रका नंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत आजुन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या नियमांचे पालन न केल्यास काही दंडही आकारण्यात येईल, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments