कारण

Saamana : भाजप-राष्ट्रवादीच्या भांडणात शिवसेनेने उडी, अग्रलेखातून हल्लाबोल…

अजित पवारांच्या बाजूने बोलताना संजय राऊत यांनी अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर धुवाधार टीका केली.

Saamana:गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Paril) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात पहाटेची शपथ विधी,सरकारला पाठिंबा देण्यावरून तर आता तेच सरकार पाडण्यासाठी केलेल्या वक्तव्यामुळे शाब्दिक चकमकी सुरू आहेत. तर आता या शाब्दिक युद्धात शिवसेनेने (Shivsena) हजेरी लावली आहे, अजित पवारांच्या बाजूने बोलताना संजय राऊत यांनी अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर धुवाधार टीका केली.

आजच्या सामना अग्रलेखातून राजकारण करण्यास आपण सक्षम नसल्याचे चंद्रकांत दादांनी दाखवून दिलं अशी टीका संजय राऊत यांनी (Sanjay raut) केली.

पत्र चोरताना अजित दादांसोबत टाॅर्च मारायला कोण कोण होते?

चंद्रकांत पाटीलांनी अजित दादांचा 54 आमदारांच्या सहीचे पत्र चोरण्याचा कारभार नैतिक आहे की अनैतिक असा प्रश्न उपस्थित करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे.पण पत्र चोरताना अजित दादांसोबत टॉर्च मारायला आणि चोरी झाल्यानंतर खिडकीतून पळून जाण्यासाठी मदत करायला, नेमकं कोण कोण होतं हे गुपित आता बाहेर यायलाच पाहिजे.भाजप आणि राष्ट्रवादीच्या या युद्धात शेवटी खेळ भाजपवर उलटला आणि या कचाट्यात चंद्रकांत पाटील सापडले.(Who was there with Ajit Dada to light a torch while stealing letters?)

चंद्रकांत दादा अजुनही पहाटेच्या शपथविधी सोहळ्यात गुंग आहेत…

देशावर कोरोनाचे संकट कोसळले असताना सर्व राजकीय नेत्यांनी संयमाने आणि गांभिर्याने वागायला हवे. नाहीतर सामान्य जनता सरकारला गांभीर्याने घेण्याचे बंद करेल, त्यामुळे नेत्यांनी तोंडाला येईल ते बोलणं बंद करायला हवयं.भाजप नेते अजुनही पहाटेच्या शपथविधी सोहळ्यात गुंग आहेत असे म्हणत राऊत यांनी भाजपच्या बेजबाबदार कारभारावर टीका केली.(Chandrakant Dada is still dumb in the morning swearing ceremony…)

चंद्रकांत दादा राजकारणातल्या गुंतागुंतीत इतके अडकणे बरं नाही

अजित पवारांबरोबर सरकार बनवून मोठी चूक केल्याने आपल्या प्रतिमेला तडा जात असल्याचे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी स्पष्टपणे सांगून त्यांच्या बाजूने या प्रकरणावर पडदा पाडला, परंतु भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मन काही त्या पहाटेचा शपथविधी सोहळातून बाहेर पडतच नाही म्हणून चंद्रकांत दादा राजकारणातल्या गुंतागुंतीत अजून मग्न आहेत पण आता हे त्यांना सांगणार कोण? असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Chandrakant Dada It is not good to get so involved in politics)

पत्रचोरीचा डाव हा चंद्रकांत दादांचा निव्वळ पोरखेळ आहे

पहाटेच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केलेल्या 54 आमदारांच्या सहीचे पत्रात घोटाळा असून अजित पवारांनी शरद पवारांच्या ड्रॉवरमधून ते पत्र चोरल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे, परंतु पत्राची चोरी हा कारभार नैतिक आहे की अनैतिक असा प्रश्न उभा करून चंद्रकांत दादांचा निव्वळ पोरखेळ सुरू आहे असे संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे. (The play of letter-stealing is Chandrakant Dada’s net play)

राजकारण करण्यास आपण सक्षम नाही असं पाटलांनी शेवटी दाखवूनच दिलं

युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं. विरोधी पक्षावर चढाई करून विजय मिळवायचा असतो त्यामुळे नैतिक-अनैतिकतेच्या पलीकडे जाऊन कार्य पूर्ण करावे लागते. कदाचित अजित पवारांचे पत्र हे भाजप आणि अजित पवार यांच्यातील एक गुप्त करार असू शकतो, जो गुप्तच राहायला हवा होता परंतु चंद्रकांत पाटील यांनी भांडाफोड करून राजकारण करण्यास आपण सक्षम असल्याचं त्यांनी दाखवून दिलयं. (In the end, Patil showed that he is not capable of doing politics)

चंद्रकांत दादांचा राजकारणातील बालिशपणा…

चंद्रकांत दादांनी अजित पवारांचे हे गुपित उघडकीस आणून तसा बोभाटा करणे योग्य नव्हते परंतु चंद्रकांत दादांनी रागाच्या भरात तडकाफडकी पहाटेच्या शपथविधी सोहळ्यातील सारे कट लोकांसमोर आणले, पण 54 आमदारांच्या सहीचे पत्र अजितदादांनी चोरले ही केवळ एक अफवा आहे. सोपान आंधळ्यांच्या सहीचे पत्र चोरण्याची अजित पवारांना कोणतीही आवश्यकता नाही तुझ्यासोबत विधी सोहळ्यापूर्वी अजित दादा हे राष्ट्रवादी विधिमंडळाचे नेते असल्यामुळे ते एक मताने निवडले गेले होते आणि आमदारांच्या सहीचे पत्रके त्यांच्याकडे असणारच.त्यामुळे पत्र चोरले किंवा बनावट पत्र सादर केल्याचा हा आरोप निव्वळ बालिशपणा आहे.(Chandrakant Dada’s childishness in politics …)

सत्ता हातातून गेलीच पण चंद्रकांत दादा अजून किती तगमग करणार आहात?

चंद्रकांत दादांनी एकीकडे अजित पवारांवर पत्र चोरल्याचा आरोप केलाय तर दुसरीकडे शिवसेनेने दगा दिला म्हणून आता त्यांना धडा वगैरे शिकवण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा दावा केला आहे. मुळात राजकारणात इकडच्या-तिकडच्या पूर्वीच्या गोष्टी सारख्या सारख्या उगळून पश्चात्ताप आणि मनस्तापाशिवाय काहीही हाती लागत नाही आणि हे चंद्रकांत दादांचासारख्या ज्येष्ठ नेत्याला वेगळे सांगायला नको, मग आता सत्ता हातातून गेल्याचे दुःख तर आहेच पण अजून किती तगमग करणार आहात चंद्रकांत दादा. (Power is out of hand but Chandrakant Dada is going to do a lot more?)

महाराष्ट्राच्या राजकारणातील बदल हा त्याच कारणामुळे आहे हे नक्की

राजकारणात सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षालाही समान महत्त्व असते पण जर विरोधी पक्ष गांभीर्याने वागत नसेल तर लोकांचा त्यांच्यावरील विश्वास हा हळूहळू कमी होऊ लागतो. भाजपने हा विश्वास गमावला आहे आणि याचे मूळ कारण त्यांच्या स्वभावातच दडलेले आहे, दिलेला शब्द पाळायचा नाही आणि ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यांच्या सर्वत्र बोंबा मारायच्या हेच त्यांचे धोरण आहे आणि याच कारणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडून आलाय हे मात्र नक्की असे संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात लिहिले आहे. (The change in Maharashtra’s politics is due this reason)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments