आपलं शहर

शासकीय कार्यालयावर भगवा ध्वज फडकवणे हा देशद्रोह- गुणरत्न सदावर्ते, पाहा काय आहे प्रकरण

भगवा ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाणे हा एक देशद्रोह आहे. त्यामुळे भगवा ध्वज शासकीय कार्यालयावर फडकवू नये अन्यता न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे वक्तव्य सदावर्ते यांनी केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जूनला साजरा केला जातो. राज्य सरकारकडून 6 जून हा दिवस साजरा करावा असे आदेश जारी करण्यात आले आहेत. कार्यालयात भगवा ध्वज लावून, गुढी उभारून राष्ट्रगीत गाण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

भगवा ध्वज शासकीय कार्यालयावर लावणे हे संविधाना विरुद्ध आहे
6 जूनला सर्व शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश दिले गेले आहेत. परंतु मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल करणारे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी यावर आक्षेप घेतला असल्याची बातमी समोर आली आहे. याच बरोबर त्यांनी असे म्हटले आहे की, भगवा झेंडा फडकवणे हे संविधानाला धरून नाही.(It is unconstitutional to hoist a saffron flag on a government office)

सरकारच्या निर्णयाला सदावर्ते यांनी केला विरोध
शिवराज्याभिषेक सोहळ्याला मराठी साम्राज्याच्या इतिहासात महत्त्व आहे. या राज्याभिषेकामुळे सर्वत्र मराठा साम्राज्य स्थापन झाल्याचे जाहीर करणे शक्य झाले. गुणरत्न सदावर्ते यांनी असे वकत्व केले आहे की, सरकारने मराठा समाजाच्या आणि विशिष्ट समाजाच्या दबावापोटी हा ध्वज फडकवण्याचा आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयाला सदावर्ते यांनी विरोध केला असून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा. अन्यथा ते कोर्टात जाणार असे त्यांनी सांगितले आहेत.(Sadavarte opposed the government’s decision)

सरकारी कार्यालयावर भगवा फडकवणे देशद्रोह आहे
सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार नोंदवली आहे. सदावर्ते असे म्हणाले की, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज संहिता २००२ -२००६ नुसार सरकारी कार्यालयांवर फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा आहे. त्यामुळे भगवा ध्वज फडकावून राष्ट्रगीत गाणे हा एक देशद्रोह आहे. उद्या कोणी येईल आणि म्हणेल अशोक सम्राटचा ध्वज फडकवा, मुघलांचा ध्वज लावा, पेशव्यांचा ध्वज लावा. त्यामुळे भगवा ध्वज शासकीय कार्यालयावर फडकवू नये अन्यता न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल.(Sadavarte said hoisting a saffron flag on a government office was treason)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments