खूप काही

Shambhu Singh Biography: चित्रपटात हिरो बनायला आलेल्या मुलाच्या पाठोपाठ बंदूक घेऊन पोहोचली आई,वाचा नक्की काय घडलं?

छोटया हवेलीतल्या रतनकुंवर बाई या हिरो बनायला गेलेल्या आपल्या मुलाच्या मागे बंदुक घेऊन गेल्या होत्या.

Shambhu Singh Biography:पूर्वीच्या काळी स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन राहण्याची प्रथा होती परंतु त्याकाळीदेखील जेव्हा गरज पडली तेव्हा घराचा उंबरठा ओलांडून हातात तलवार घेऊन स्त्रियांनी आपल्या शुरतेचे प्रमाण या समाजाला दाखवून दिले होते.अशीच एक शुर क्षत्राणी छोटी हवेलीमध्ये होती तिचे नाव होते रतनकुंवर बाई.

अनेकदा ओलांडायला लागला घरचा उंबरठा…

रतनकुंंवर बाईंचा मुलगा शंभूसिंह लहान असतानाच रतनकुंवर यांचे पती भैरीसिंह यांचे निधन झाले. मुलगा लहान असल्यामुळे अनेकदा रतन कुवर बाईंना आपल्या घराचा उंबरठा ओलांडून हातात बंदूक घेऊन बैलगाडीवर शेतावर अतिक्रमण करणाऱ्या पशु पक्षांना आटोक्यात आणण्यासाठी जावे लागत असे. (Mother followed the boy who came to be the hero in the movie with a gun, read what exactly happened?)

एवढंच नाही तर जेव्हा त्यांचा मुलगा शंभू सिंह तरुण वयात मुंबईला अभिनेता बनण्यासाठी आला होता, तेव्हा त्याचा मागे पण त्या बंदूक घेऊन आल्या होत्या.

आता रतनकुंवर बाई आणि शंभूसिंह अस्तित्वात नाहीत परंतु त्यांचे वंशज शिवेंद्रसिंह आणि त्यांचे कुटुंब अजून देखील घराण्याचे तख्त् सांभाळून आहेत.

बेसहारा स्त्री समजून संपत्ती वर कब्जा करू बघत होते लोक-

पूर्वी छोटी हवेली ही मोतीसिंह यांची होती. पण त्यांना मूल नव्हतं म्हणून त्यांनी सांगूलमधील चंदेल कुटुंबाच्या तख्तसिंहला आपला मुलगा म्हणून स्वीकारले होते. पुढे काही वर्षांनंतर तख्तसिंह यांचे पुत्र भैरोसिंह यांचा विवाह रतन कुंवर बाई सोबत झाला आणि मग शंभू सिंह यांचा जन्म झाला. असे छोट्या हवेलीच्या शिवेंद्र सिंह राजपूत यांनी आपल्या पूर्वजांनी सांगितल्येला जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले.(People who understand the helpless woman were looking to seize wealth)

जेव्हा शंभु सिंह लहान होते तेव्हाच त्यांचे वडील भैरो सिंह यांचे निधन झाले आणि सगळी जबाबदारी रतन कुंवर यांचावर येऊन पडली. आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर रतन कुंवर बाईंचे घरातून बाहेर पडणे बंद झाले. मग एक बेसहारा बाई समजून तिच्या शेती आणि संपत्तीवर लोकांनी कब्जा करायला सुरुवात केली.

चित्रपटात नायक बनायला निघून आले शंभू सिंह-

लोकांना तोंड देण्यासाठी, आपल्या मुलाच्या संगोपनासाठी आणि आपल्या नवऱ्याची संपत्ती वाचवण्यासाठी रतन कुंवरने घरचा उंबरठा ओलांडायचा निर्णय घेतला. ती बंदूक घेऊन शेतामध्ये गेली आणी लोकांनी केलेला कब्जा त्यांना काढायला सांगितला. (Shambhu Singh left to become a hero in the film -)

त्यानंतर शंभु सिंह ग्वालियरला शिकायला गेले. यातच त्यांचा चमकता चेहरा आणि शरीरयष्टी बघून त्यांना मुंबईला जाऊन हिरो बनण्याचा सल्ला दिला,मग ते मुंबई ला निघून आले. हे सगळं त्यांच्या आईला कळताच त्या बंदूक घेऊन ट्रेन मधून निघाल्या आणि त्यांनी त्याला शोधु काढून एक फटकर लावून त्यांना आपल्या सोबत घेऊन परतल्या.

यानंतर सुरु झाला शंभू सिंह यांचा राज नैतिक प्रवास.

विजयाराजे सिंधिया यांनी काँग्रेस सोडून जनसंघासोबत हात मिळवला. मग शंभुसिंह यांनी निवडणूक लढवली आणी ते जिंकले सुद्धा. ते विदिशा कडून जनसंघाचे पाहिले आमदार झाले. त्यानंतर शंभुसिंहानी जुन्या हवेलीचा जीर्णोद्धार केला.(Shambhu Singh’s political Journey.)

आज भाजपचे कार्यकर्ते आहेत शंभुसिंह यांचे वंशज-

फक्त 37 वर्षांचे असतानाच शंभु सिंह यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा शिवेंद्र आणि अनिता राजपूत आतादेखील पुर्वजांप्रमाणे मेहनती कार्यकर्ते काम करत आहेत. (biography of shambhu Singh)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments