खूप काही

विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र करणार, शरद पवारांनी ठोकला शड्डू | sharad pawar met opposition

21 जून रोजी राजकीय प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

sharad pawar met opposition : 21 जून रोजी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Political strategist Prashant Kishor) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (President Sharad Pawar) भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या 6 जनपथवरील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती, त्या भेटीच्या काही तासानंतर शरद पवार अनेक विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेणार असल्याची बातमी समोर आली. (opposition parties will meet tomorrow at sharad pawar house)

राष्ट्रवादीकडून अधिकृत माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांच्या रणनितीबद्दल मोठं विधान केलं आहे. सर्व विरोधी पक्षातील नेत्यांना एकजूट करणे हाच अझेंडा शरद पवार यांनी ठरवलेला आहे. सुरुवातीला काही मोजके पक्ष एकत्र नसतील, मात्र हळू हळू सगळ्या पक्षांना एकत्र कसं आणता येईल, यावर उद्या (22 जून रोजी) होणाऱ्या बैठकीत ठरवलं जाईल, असं मत नवाब मलिक यांनी मांडलं आहे. (meet prashant kishor in delhi today)

काँग्रेसचा खुलासा

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या झालेल्या बैठकीवर काँग्रेसनेही आपली भूमिका मांडली आहे. अनेक राजकीय उलथापालथ होत असताना शरद पवार यांनी अशा बैठकी घेतल्या आहेत, अशी बैठक घेणे ही नवीन गोष्ट नाही, याआधीही अशा अनेक बैठका झाल्या आहेत, त्यामुळे या बैठकीकडे नवीन उद्देशाने पाहणे योग्य नाही, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी मांडलं आहे.

कोण असणार भेटीला

 • यशवंत सिन्हा
 • पवन वर्मा
 • संजय सिंग
 • डी राजा
 • फारुख अब्दुल्ला
 • न्यायमूर्ती ए पी सिंह
 • जावेद अख्तर
 • के टी एस तुळशी
 • करण थापर
 • आशुतोष
 • अ‍ॅड. मजीद मेमन
 • खासदार वंदना चव्हाण
 • माजी सीईसी एस. वाय. कुरेशी
 • के सी सिंह
 • संजय झा
 • सुधींद्र कुलकर्णी
 • कॉलिन गोन्साल्विस
 • अर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार
 • घनश्याम तिवारी
 • प्रीतीश नंदी

असे नेते बैठकीला असण्याची  शक्यता प्राथमिक तत्वावर वर्तवण्यात येत आहे.

याआदीही दोन चाणक्यांची भेट

काही दिवसांपूर्वीही राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राजकारणातील चाणक्य समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट झाली होती. मुंबईतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती, या भेटीचं कारण अद्यापही स्पष्ट न झाल्याने अनेक राजकीय विश्लेषकांनी आपले मुद्दे या भेटीला जोडले होते. आज (21 जून रोजी) झालेल्या किशोर आणि पवार यांच्या बैठकीचं ठळक कारण अद्याप समोर न आल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments