कारण

Shiv Sena Bhavan clashes: शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलाय आता शिवभोजनथाळी द्यायची वेळ येऊ नये-खा.संजय राऊत

'शिवसेना भवनासमोर राडा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवप्रसाद देण्यात आला आहे. मला वाटतं हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे. शिवभोजन देण्याची वेळ आणू नका' -खा.संजय राऊत

Shiv Sena Bhavan clashes: शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राडा झाल्याचं पाहायला मिळाले. दादरमधील शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी देखील झाली.

शिवभोजनथाळी देण्याची वेळ आणू नका- संजय राऊत
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाला असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली. ‘शिवसेना भवनासमोर राडा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवप्रसाद देण्यात आला आहे. मला वाटतं हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे. शिवभोजन देण्याची वेळ आणू नका’. असं मत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी मांडलं आहे.

भवनावर हल्ला करण्याचं कारण काय?
‘शिवसेना भवण हे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहे. त्यामुळे शिवसेना भवनावर हल्ला करण्याची त्यांची हिम्मत कशी झाली. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? जर तुम्हाला लिहिता-वाचता येत असेल, तर अग्रलेख पुन्हा नीट वाचा. प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी केले.(What is the reason for attacking Shiv Sena Bhavan?)

भाजपवर कोणताही आरोप केलेला नाही
जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात लिहल आहे. याबाबतीत भाजपवर आम्ही आरोप केले नाही. कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा प्रश्न राऊत यांनी केला.(No allegations have been made against the BJP)

केंद्र सरकारला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.
आरक्षण विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची चर्चा झाली आहे. आज खासदार संभाजी छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होईल. ते या चर्चेतून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतील. आरक्षण हा विषय नाजूक असल्याने, सर्व समाजाला आरक्षण हवे आहे, त्यामुळे केंद्र सरकारला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. आरक्षणाबाबत केंद्र सरकारला राष्ट्रीय धोरण ठरवावं लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.(The Central Government will have to take the right decision regarding Maratha reservation)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments