खूप काही

Shiv Sena Bhavan : ऑन रेकॉर्ड सांगतो, शिवसेना गुंडगिरी करते, संजय राऊत भडकले…

राम मंदिर तिर्थ न्याय संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत, त्यातच देशातील अनेक बड्या नेत्यांनी थेट सवाल करण्यास सुरुवात केली आहे.

Shiv Sena Bhavan : राम मंदिर तिर्थ न्याय संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत, त्यातच देशातील अनेक बड्या नेत्यांनी थेट सवाल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनीदेखील सामनाच्या अग्रलेखातून थेट राम मंदिर न्यासाला सवाल केला आहे. त्यावरून मुंबईमध्ये राण पेटल्याचं चित्र निर्माण झालं आहे. (Shiv Sena commits bullying, says Sanjay Raut)

शिवसेनेने विचारलेल्या सवालावरून भाजपच्या अनेक नेत्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याचच उत्तर म्हणून भाजपने शिवसेनेच्या भवनावर मोर्चा काढला होता, मात्र सेना भवनावर मोर्चा काढल्याच्या रागातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता.

भाजप आणि शिवसेना यांच्यात अनेक वर्षांची असलेली युती तुटल्याने दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत आहेत, मात्र आता हे वाद उघडपणे दिसून आले, त्यातच शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही आंदोलनकर्त्यांना चोख उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोणीही जर शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर आम्हीही शांत बसणार नाही, असं उत्तर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलं आहे. शिवसेना गुंडगिरी करते, आणि त्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, शिवसेना भवनावर कोणीही आंदोलन करायचं नाही, ते आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे, ती बाळासाहेबांची वास्तू आहे, असंही संजय राऊत सांगायला विसरले नाहीत.

शिवसेना भवन हे मराठी शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक आहे, या वास्तूत बसुन बाळासाहेबांनी राज्याचा आणि देशाचा कारभार हाकला आहे, त्याच वास्तूच्या दिशेने जर कोणी चाल करत असेल तरआम्ही ते सहन करणार नाही, त्यासाठी आम्ही गुंडही बनू असं मत संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे,

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments