खूप काही

Sanjay Raut Comment : राज-उद्धव एकत्र येणार का? संजय राऊतांनी राज ठाकरेंना फटकारलं

एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता.

Sanjay Raut Comment : एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे एकत्र येणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी परमेश्वराला माहिती, असं उत्तर दिलं होतं. (Shiv Sena MP Sanjay Raut’s reply to Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी दिलेल्या या संकेताला शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ता संजय राऊत (Shiv Sena chief spokesperson Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे. राजकारण हे आपल्या आपण करायचं असतं. परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला खुद्द परमेश्वरही मदत करत नाही. अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांना दोन्ही भावंडे एकत्र येण्यावरून प्रश्न विचारला होता, त्यावेळेस त्यांनी देवाकडे हात दाखवले होते आणि परमेश्वराला माहित असं उत्तर त्यांनी दिलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना याबाबत विचारल्यास त्यांनी संपूर्णरित्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हेच या मुद्दाचा विचार करू शकतात, असं उत्तर दिलं होतं.

सेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र याच्यावर स्पष्ट मत दिलं आहे. राजकारणाच्या गोष्टी परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात, परमेश्वर कधीही मध्यस्ती करत नाही. परमेश्वर राजकारणात कधीही मदत करत नाही, आपल्या आपण राजकारण करायचं असतं, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

मनसेकडून अध्याप यासंदर्भात कोणतीच भूमिका न आल्याने मनसे यावर काय उत्तर देणार आणि याचे भविष्यातील राजकारणात काय पडसाद पडणार हेच पाहणे गरजेचे असेल. (Shiv Sena MP Sanjay Raut’s reply to Raj Thackeray)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments